बिजेपार येथे मुलींच्या वसतिगृहाच्या नवइमारतीचे भूमिपूजन

0
3

देवरी,दि.२३- सालेकसा तालुक्यातील बिजेपार येथे देवरी आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसराम कोरोटे यांचे हस्ते आदिवासी शासकीय मुलीच्या वसतिगृहाच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन शनिवारी (दि.२१) करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बिजेपारच्या सरपंच मंगला कुंभरे या होत्या.यावेळी  कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कटरे,  जि.प.सदस्य वंदना काळे, माजी महिला बाल कल्याण सभापती लता दोनोडे, रमनलाल आत्राम, गोर्हेचे सरपंच रामेश्वर कटरे, हरिश्चंद्र बाघमारे, सालेकसा पंस सदस्य  वीणा वट्टी, माजी सभापती दिलीप वाघमारे,  लक्ष्मण लटये,  वी वी कटरे, नारायण वालदे, राधेश्याम इळपाते, डिलेश्वरी शहारे, महेतर वट्टी, निर्मला मरकाम, सुभाष इनवाते, सिंधू चुटे, नरेंद्र गायकवाड, राजू इनवाते, पुस्तकला भोयर, वर्षा भोयर, कविता चुटे, युवराज कटरे, रमेश शहारे, हिरालाल कटरे, गायत्री राणे, संजय दोनोडे, प्रा. चोपकर,  शरणागत, दिलीप राणे, कंत्राटदार जैन आदी मान्यवर उपस्थित होते.

 आदिवासी शासकीय मुलींच्या नवीन इमारतीसाठी ८ कोटी ५६ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या वन इमारत बांधकामामुळे विद्यार्थ्यांच्या राहण्याची उत्तम सोय होईल, असे मनोगत नागरिकासह विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. यावेळी परिसरातील पक्ष कार्यकर्ते , नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.