आम्ही भ्रष्टाचाऱ्यांना सोबत घेत नाही,तर तुरुंगात पाठवतो-भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा

0
10

भाजप राष्ट्रीय अध्यक्षांच्या महाराष्ट्रातील पहिल्याच सभेकडे मतदारांनी फिरवली पाठ

गोंदिया,दि.१२-काँग्रेसच्या काळात भष्ट्राचाराने कळस गाठल्याचे सांगत,टुजी घोटाळ,काॅमनवेल्थ घोटाळा असो की सध्याचा दारुघोटाळा आम्ही घोटाळेबाजांना सोबत घेत नाही,तर त्यांना तुरुंगाची हवा देतो असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा म्हणाले.भाजप भ्रष्टाचाऱ्यांना सोबत घेत नाही,तर जेलची हवा चारते उलट विरोधी पक्षाची इंडिया आघाडी भ्रष्टाचारी लोकांना वाचविण्याची धडपड करीत असल्याचे सांगत भ्रष्ट्राचार करणार्यांच्या यादीचा पाढाच वाचत अर्धे जेलमध्ये तर अर्धे बेलवर बाहेर असल्याचीही टिका केली.नड्डा यांची ही महाराष्ट्रातील पहिलीच सभा आहे.

दोन मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचाराकरीता आयोजित सभेला मात्र ५ हजाराच्याआतच लोकांच्या उपस्थितींने दोन्ही उमेदवाराबंद्दल मतदारामध्ये अनुत्साह असल्याचे दिसून आले.राष्ट्रीय अध्यक्षांच्या सभेला पाचहजाराच्यावर लोकांची नसलेल्या हजेरीबद्दल भाजपच्या अनेक युवा नेत्यामंध्ये नियोजनाचा अभाव असल्याचा सुर एैकावयास मिळाला.

भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघाचे उमेदवार सुनिल मेंढे व गडचिरोली चिमूर मतदारसंघातील ११ पक्षाच्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराकरीता भाजपचे राष्ट्रिय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची जाहीर सभा सर्कस मैदानात पार पडली.त्या सभेला नड्डा मार्गदर्शन करीत होते.या सभेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ,शिवसेना नेते डॉ.दिपक सावंत राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र जैन य़ांच़्यासह इतर पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.सदर सभेला नड्डा हे तीन तास उशीराने पोचले,अनं अवघ्या २० मिनीटात आपलं भाषण आटोपून परत निघाले.

गोंदियात आज शुक्रवारला भाजपचे राष्ट्रिय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.त्या सभेला तालुक्यातील युवकांची हजेरी.डोक्यावर राष्ट्रवादीची टोपी व दुपट्टा आणि चेहर्यावर मोदींचा चेहरा लक्षवेधक राहिले

देशामध्ये सध्या दोन विचारधारेच्या विरोधातील लढाई सुरु असून ज्यांच्याजवळ भारताच्या विकासाचे व्हीजन नाही.तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा फक्त विरोध हाच अजेंडा असल्याची टिका विरोधी पक्षावर भाजप राष्ट्रिय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी केली.सोबतच आमचा जातनिहाय जनगणनेला विरोध नाही.देशातच नव्हे तर राज्यातही भाजप व महायुती जातीय जनगणनेच्या बाजून आहे,मात्र कॉंग्रेस जातीगत जनगणनेच्या नावावर जातीय गटातटाचे राजकारण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले.मोदी सरकारने देशाच्या राजकारणाचा चेहरामोहरा बदलून टाकला असून याआधी केवळ उच्चनीच, शहरी-ग्रामीण, आणि जातीधर्माच्या नावाने होणाऱ्या राजकारणास हद्दपार केले. मोदी यांनी राजकारणाची परिभाषाच बदलून टाकली असून आता विकासाचे राजकारण केंद्रस्थानी आले आहे. विकासाच्या मुद्द्यावर व सबका साथ सबका विकास, सबका प्रयास या नीतीने देशाच्या राजनीतीला नवी दिशा मिळाली आहे.
श्री.नड्डा पुढे म्हणाले की,प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या १० वर्षाच्या कार्यकाळात विकासत्मक धोरणाला महत्व दिले आहे.महिलांना न्याय दिले,गरिबांना विकासाच्या धोरणात आले.देशातील २५कोटी लोकांना गरीबीरेषेच्या वर आणले असून ८० कोटी जनतेला ५ किलो राशन आमचे सरकार निःशुल्क देत असल्याचे सांगितले.ज्या महिंना चुलीवर स्वयपांक करतांना धुराचा सामना करावा लागायचा त्यांना उज्वला योजनेच्या माध्यमातून सिलेंडर गॅस उपलब्ध करुन दिल्याने स्वयंपाक घरातील धुर दूर करीत महिलांच्या आरोग्याची काळजी घेतल्याचे म्हणाले.यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे,शिवसेना नेते दिपक सावंत यांनीही विचार व्यक्त केले.संचालन जयंत शुक्ला व सीताबाई रहागंडाले यांनी केले.