गोंदिया,दि.15ः-तालुक्यातील चांदणीटोला येथे गुरुवारच्या(दि.14)सायंकाळला घरगुतीकामाच्या वादातून झालेल्या भांडणात चारजण जखमी झाल्याची घटना घडली आहे.यामध्ये सुनिल दमाहे हा 27 वर्षीय युवक गंभीर जखमी झाल्याने त्यास नागपूरला हरविण्यात आले आहे.सविस्तर असे की,गोंदिया ग्रामीण पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या चादंणीटोला येथे घरबांधकामाच्या मुद्याला घेऊन भांडण मारहाणीपर्यंत गेले.यात आरोपीने लोखंडी राॅड व काठीच्या दांड्याने मारहाण केली.यामध्ये शकुन दमाहे,सोनू दमाहे व अन्य एक जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.




