नागपूर येथे प्रयोगशाळा कर्मचारी महासंघाची विभागीय बैठक आज

0
7

गोरेगाव,दि. ८–प्रयोगशाळा कर्मचारी महासंघाची राज्यातील सर्व विभागात ९ ऑगस्ट रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे. नागपूर विभागीय शिक्षण मंडळातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील प्रयोगशाळा सहायक व प्रयोगशाळा परिचर यांची बैठक नागपूर येथे आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीला जिल्ह्यातील सर्व प्रयोगशाळा कर्मचारी बांधवांना उपस्थित राहण्याचे म.रा. प्रयोगशाळा कर्मचारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष गोपीचंद कुकडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख नरेंद्र भट यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात आवाहन केले आहे. या बैठकीत आकृतिबंधाच्या कर्मचाèयांच्या अतिरिक्त ठरावे, वेतन ऑनलाईन, ऑफलाईन या विषयावर चर्चा करणे व प्रयोगशाळा कर्मचाèयांवर होणाèया अन्यायाला वाचा फोडण्यासाठी विभागीय संघटनेची कार्यकारिणी गटीत करून विभागातून सर्व तक्रारी समस्यांचे निराकरण करणे गरजेचे झाले आहे. करिता बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन गोपीचंद कुकडे यांनी केले आहे.