डाॅक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गेला रुग्णाचा जीव

0
53

गोंदिया दि. १0: आदिवासी बहुल जिल्ह्याच्या असलेल्या केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात मोठय़ा प्रमाणात हलगर्जीपणा होत असल्यामुळे येथील रूग्णांला प्राण गमावण्याची वेळ आली. येथील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल परियाल यांच्या हलगर्जीपणामुळे तरूणाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृतकाच्या नातेवाईकांनी करीत आरोग्य यंत्रणेविरूध्द असंतोष व्यक्त करून मृताच्या नातेवाईकांनी दोन तास मृतदेह रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच रोखून धरला.सोबतच वैद्यकीय अधिकारी डाॅ.अनिल परियाल ला निलबिंत करण्याची मागणी केली.विशेष म्हणजे बेरार टाईम्सने शनिवारच्या आपल्या आॅनलाईन वृत्तामध्ये केटीएस व बीजीडब्लू मध्ये वीज पुरवठा खंडीत झाल्याने रुग्णांचे हाल होत असल्याचे वृ्त्त प्रकाशित केले होते.रुग्णालयामध्ये जनरेटर असतानाही ते सुरु न करण्यात आल्याने रुग्णाला पाहिजे ती सेवा मिळू शकली नाही.
दवनीवाडा येथील नूतनकुमार राजू लोणारकर (२५) या तरूणाने १ ऑगस्ट रोजी विषप्राशन केल्यामुळे त्याला गंभीर अवस्थेत केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार केल्यामुळे त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. परंतु ८ ऑगस्टच्या रात्री विद्युत पुरवठा खंडीत झाल्यानंतर जनरेटर सुरु करण्यात आले नाही. त्यामुळे उपचार होऊ शकला नाही. परिणामी माझ्या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृत तरूणाचे वडील राजू लोणारकर व काका रेवा लोणारकर यांनी केला आहे. शासनानतर्फे केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयाला वर्षाकाठी कोट्यवधी रूपयाचा निधी देण्यात येतो. परंतु विद्युत पुरवठा खंडीत झाल्यास येथे रूग्णांच्या नातेवाईकांनाच विजेची सोय करावी लागत असल्याची खंत मृत नूतनकुमारच्या वडीलांनी व्यक्त केली. नूतनकुमार याच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. अवघ्या दोन दिवसात डॉक्टर सुट्टी देणार होते. मात्र विद्युत गेली तेथील डॉक्टरांनी ऑक्सिजन न लावल्यामुळे नूतनकुमारचा मृत्यू झाला असा आरोप करण्यात आला. नूतनकुमारला ऑक्सिजन लावण्यासाठी नूतनकुमारच्या वडिलांनी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल परियाल यांना फोन केला असता डॉक्टर परियाल यांनी मृताच्या नातेवाईकांचे समाधान न करता त्यांच्याशी उर्मट वागणूक केली. सरकार जेव्हा पैसे पाठविल तेव्हा लाईट सुरू करू, आम्ही कुठले पैसे आणणार, जनरेटरमध्ये डिझेल टाकायला पैसे नाहीत असे बोलून त्यांनी त्या मृताच्या नातेवाईकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी मृताचे नातेवाईकांमध्ये आरोग्य यंत्रणेच्या प्रती आक्रोश होता. डॉ. अनिल परियाल यांना रात्री १0.२५ वाजता मृताचे काका रेवा लाणारकर यांनी फोन लावला, परंतु त्यांच्याशी उध्दट वागणूक करण्यात आली. रूग्णाचा योग्यवेळी उपचार न झाल्यामुळे नूतनकुमारचा रात्री ११.३0 वाजता दरम्यान मृत्यू झाला. नूतनकुमारच्या मृत्यूनंतर आरोग्य प्रशासनाप्रती आक्रोश व्यक्त होऊ लागला. यावेळी बजरंग दलाचे प्रांत संयोजक देवेश मिश्रा, सहसंयोजक वसंत ठाकूर, पं.स. सदस्य गुड्ड लिल्हारे व मृतांच्या नातेवाईकांनी सकाळी ११ वाजता उत्तरीय तपासणी झाल्यानंतर मृतदेहाला जिल्हा शल्य चिकित्सकाच्या कक्षाकडे जाणार्‍या दारावर तब्बल दोन तास मृतदेह मृतदेह रोखून धरला. जिल्हा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल परियाल यांना त्वरित निलंबित करा या मागणीला घेऊन जिल्हा सामान्य रूग्णालयात आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी आ. खुशाल बोपचे, जि.प.च्या आरोग्य सभापती रचना गहाणे,भाजप जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्या उपस्थितीत जिल्हा शल्य चिकित्सक यांनी चौकशीचे आश्वासन दिल्यांनतर मृतदेह उचलम्यात आला.