खासदार नाना पटोले यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट

0
10

नवी दिल्ली दि.१०: भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे खासदार नाना पटोले यांनी सोमवारी महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली.परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री. पटोले यांचे स्वागत केले. महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने दिल्लीत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, प्रकाशित करण्यात येणारी विविध प्रकाशने आणि प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आदींची माहिती श्री. कांबळे यांनी दिली. यावेळी श्री. पटोले यांना महाराष्ट्र परिचय केंद्राची प्रकाशने भेट देण्यात आली. परिचय केंद्राचे ग्रंथालय तसेच कार्यालयाच्या विविध विभागांना श्री. पटोले यांनी भेट देऊन चौकशी केली.