चित्रलेखाराजे भोसले यांच्या पार्थिवाचे मुख्यमंत्र्यांनी घेतले अंत्यदर्शन

0
8

नागपूर दि.१६-: रामटेकच्या माजी खासदार चित्रलेखाराजे तेजसिंगराव भोसले यांचे रविवारी वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाल येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करुन अंत्यदर्शन घेतले व कुटुंबियांचे सांत्वन केले.चित्रलेखाराजे या 1998 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून लोकसभेवर निवडून आल्या होत्या. त्यांचा जन्म 26 फेब्रुवारी 1941 रोजी तत्कालीन बडोदा येथे झाला. 15 डिसेंबर 1959 रोजी राजे तेजसिंगराव यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांच्या मागे दोन मुले, तीन मुली, सूना, नातवंडे असा आप्त परिवारआहे.
त्या राजे शहाजीराव गायकवाड कॉलेज एम.एस. विद्यापीठ बडोदा येथून पदवीधर झाल्या. त्यांना चित्रकलेमध्ये विशेष रुची होती. त्या नागपूर जिल्हा व्हॉलीबॉल असोशिएशनच्या अध्यक्षा होत्या. शिवाय त्या 12 व्या लोकसभेच्या सदस्याही होत्या.उद्या दिनांक 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता त्यांच्यावर काशीबाई देऊळ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.