35.7 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ श.जा .ति.जि.प. आंतरराष्ट्रीय शाळा गोरेगाव येथे पोलीस शहीद दिवस साजरा

श.जा .ति.जि.प. आंतरराष्ट्रीय शाळा गोरेगाव येथे पोलीस शहीद दिवस साजरा

0
334

blank

गोरेगाव- शहीद जा.ती. जि. प. हाय. व क. महा.गोरेगाव व पोलीस स्टेशन गोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक श. जा .ती.जि. प. क. महाविद्यालय गोरेगाव येथे पोलीस शहीद दिवस साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य एम. पी. शेख व गोरेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार नारनवरे साहेब यांच्या हस्ते स्व. शहीद हेतराम इसरामजी कटरे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख उपस्थित गोरेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस श्री. नाईक श्री. विनोदजी कटरे गोरेगाव, श्रीमती गिताबाई हेतराम जी कटरे त्यांचा मुलगा श्री. संदीप हेतराम जी कटरे, त्यांची बहिण सो. देवांगणाबाई पटले सुकपूर (बोरगाव) प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचेऔचित्य साधून
ठाणेदार नारनवरे साहेब यांनी आपल्या मार्गदर्शनातून पोलीस शहीद दिवसाचे महत्व पटऊन दिले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. एन. के. गजभिये मॅडम यांनी केले. त्याप्रमाणे आभार प्रदर्शन श्री. एम. एच. पटले यांनी केले. कार्यक्रमाला श्रीमती व्ही. बी. कावळे मॅडम, श्रीमती एन. डी. राऊत मॅडम, काजी मॅडम, गोतमारे मॅडम, रामटेके लिपीक, रेखाबाई(परिचर) तसेच विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते .

blank