रेभे यांच्या स्मृतीत गुणवंत विद्यार्थी व वरिष्ठांचा सत्कार

0
30
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गोंदिया दि.२३: जिल्हा सोनार समाज ट्रस्ट व सुवर्णकार समाजाच्या संयुक्तवतीने गोविंद रेभे यांच्या स्मृतीत समाजातील गुणवंत विद्यार्थी व वरिष्ठ सदस्यांचा सत्कार मंगळवारी करण्यात आला.
अध्यक्षस्थानी मनोरमा येरपुडे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून अँड. कृष्णराव उदापूरे, धरमचंद येरपुडे, राजाराम कावळे, ताराचंद ढोमणे, अँड. इंद्रजीत गुरव, सितकू फाये, विजय ढोमणे, पांडूरंग निनावे, विठ्ठल भरणे, शाम येरपुडे, भय्या श्रीरंग, आत्माराम भरणे, केशव यावलकर, हिरा कावळे, किशोर येरपुडे, महागु पोगळे, माधव यावलकर, श्रीकृष्ण बांगरे, जगदीश येरपुडे व मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी पाहुण्यांनी समाजबांधवांनी एकत्र येऊन कुटीर उद्योगासारखे व्यवसाय सुरू केल्यास समाजबांधवांची आर्थिक बाजू मजबूत होणार असल्याचे मत व्यक्त केले. दरम्यान नवनिवार्चित जिल्हा परिषद सदस्य सुरेश हर्षे, धापेवाडाच्या सरपंच रिना रोकडे, नगरसेविका देवका उरकुडे यांच्यासह वयाची ७५ वर्षे ओलांडणार्‍या वरिष्ठ सदस्यांचा सत्कार करण्यात आला. याशिवाय ऐश्‍वर्य घनश्याम कावळे, अनुश्री आष्टीक भजे, राहूल भरत कुंभलवार, पूजा अनिल वडीचार, मनोरमा चंदनलाल येरपूडे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रास्तावीक समाजाचे सचिव अरूण हाडगे यांनी मांडले. संचालन नरेंद्र पोतदार यांनी केले. आभार केशव यावलकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी सोनार समाज ट्रस्ट व सुवर्णकार समाजाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.