नगर पंचायत मनसे पूर्ण ताकदीशी लढणार-गडकरी

0
10

गोंदिया,दि.२२:-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पक्ष स्थापनेनंतर गोंदियात झालेल्या निवडणुकीत अद्यापपर्यंत डोळेझाक होत असली तरी मात्र आता पक्ष पुनर्बांधणीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना गोंदिया जिल्ह्यातील नवनिर्मित नगर पंचायतीच्या निवडणुकीत पूर्ण ताकदीशी लढणार असल्याची ग्वाही मससेचे सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी दिली. ते आज, २२ ऑगस्ट रोजी गोंदिया येथील पक्षाच्या मेळाव्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रपरिषदेत बोलत होते.
याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष मनिष चौरागडे, सुरेश ठाकरे,मुकेश मिश्रा, आमगाव तालुकाध्यक्ष मुन्ना गवळी, शलेश डोंगरेउदय काळे , आदी उपस्थित होते. जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर एकमेकाचे कट्टर शत्रू असलेल्या भाजप-काँग्रेसनी सत्तेसाठी अभद्र युती करून जनतेशी विश्वासघात केला असल्याची टिका गडकरी यांनी यावेळी केली. नुकतेच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील ९ सरटिणीसाची नियुक्ती केली. त्यात विदर्भाला स्थान देत हेमंत गडकरी यांची सरचिटणीस पदी नियुक्ती केली आहे. त्यानंतर विदर्भातील टोकाच्या गोंदिया जिल्ह्यातून पक्षबांधणी व आत्मqचतन करिता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात पक्षातील कार्यकत्र्यांना संबोधित करतांनी हेमंत गडकरी म्हणाले की जुने जे झाले ते गंगेत गेले. पण आता नव्याने पक्षबांधणी व कार्यकत्र्यांना नवे प्रोगाम देण्याकरिता तसेच मनसेसैनिकांकडून स्थानिकांचे प्रश्न, भूमिपुत्राचे आंदोलन आदी देण्यात आले असून पुढील एक महिन्यात जिल्ह्यातील प्रश्नांची यादी सादर करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच नवनियुक्त जिल्हाध्यक्ष मनिष चौरागडे यांच्यासह नवीन जिल्हा कार्यकारिणी गठित करण्यात आली आहे. पक्ष स्थापनेनंतर निवड झालेल्या गोंदिया जिल्ह्यातील अध्यक्ष व कार्यकत्र्यांनी पाहिजे तसे कार्य पूर्वीच्या पदाधिकाèयांनी केले नाही. त्यामुळे कार्यकत्र्यांत असलेला हा उणिवा दूर सारण्याचे प्रयत्न केले जाणार आहे. तसेच पक्षाची घोडदौड कशी वाढेल याची काळजी घेतली जाईल. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव, आमगाव, सालेकसा, देवरी, सडक अर्जुनी, मोरगाव अर्जुनी या सहा तालुक्यात होणाèया नगर पंचायतीच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीशी लढणार अशी हमी दिली.