आठ कोटी रुपयांचे ऊसाचे चुकारे थकीत

0
10

गोंदिया दि.२३: वैनगंगा शुगर अँन्ड पॉवर कारखान्याचा ऊसाच्या गळीत हंगामात दीड लाख टन उसचे गाळप होऊन साखर तयार झाली. कारखान्याने आतापर्यंत साखर, बगास व मळीची विक्री केली. परंतु अजुनही ऊसाचे शेतकर्‍यांचे आठ कोटी रुपयांचे चुकारे थकीत आहेत.
कामगार व कर्मचार्‍यांचे वेतन, दिवाळी बोनस, ठेकेदारांचे व वाहतुकदारांचे पैसे त्यांना मिळालेले नाहीत. कारखाना प्रशासनाच्या उदासीन धोरणाचा फटका सर्वांना सहन करावा लागत आहे.
भंडारा जिल्ह्यातील नगदी पीक म्हणून ऊसाकडे पाहिले जाते. पूर्ती उद्योग समुहाने कारखाना विकत घेतला त्यावेळी वैनगंगा शुगर अँन्ड पॉवर कारखान्याच्या पहिल्या गळीत हंगामाच्या शुभारंभावेळी ऊस उत्पादकांना चांगले दिवस येण्याचे स्वप्न दाखविले होते. मात्र कारखान्याच्या तीन वर्षाच्या काळात त्या आश्‍वासनाची वेळेवर पुर्ती होताना दिसून आलेली नाही. परिणामी अनेक शेतकर्‍यांनी ऊसाच्या शेतीचे क्षेत्र कमी केले. कारखाना प्रशासनाने मात्र कर्मचार्‍यांवर दोष कामगार कपातीचे धोरण मध्यंतरी अवलंबिले होते. त्यामुळे कर्मचारी व कामगारांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.