कृषी विषय समितीच्या बैठकिला सभापतीच्या नातेवाईकाची हजेरी

0
10

गोंदिया दि. २६:-गोंदिया जिल्हा परिषदेच्या कृषी विषय समितीची बैठक आज बुधवारला कृषी व पशुसवधंर्न सभापती छाया दसरे यांच्या उपस्थितीत त्यांच्या कक्षात घेण्यात आली.शासकीय नियमानुसार या बैठकिला लोकप्रतिनिधी जे समितीचे सदस्य असतील ते किंवा जिल्हा परिषद सदस्य ,इतर विषय समितीचे सभापती आणि अधिकारी उपस्थित राहू शकतात.परंतु आज झालेल्या बैठकीत कृषी सभापतींचे एक सख्खे नातेवाईक या बैठकीत उपस्थित होते.त्यांच्यासमोरच आढावा बैठक घेण्यात आली. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षातर्फे निवडून आलेल्या या सदस्या आहेत.आणि भाजपचे नेते व पंतप्रधान यांनी महिला पदाधिकारी यांच्याबाबतीत बोलतांना महिलांनी स्वत आत्मनिर्भर व्हावे आपल्या बाजुला आपल्या कुठल्याही नातेवाईकाला बसविण्याची परंपरा टाळण्याचे आवाहन केले होते.परंतु पंतप्रधान मोदी यांच्याच आवाहनाला त्यांच्याच पक्षाच्या महिला सभापतींनी आज विषय समितीच्या बैठकित छेद दिल्याची चर्चा होती.विशेष म्हणजे आज बैठकीला बसले उद्या हेच अधिकारी,कर्मचारी यांना सुध्दा असे करा तसे करा सांगून रोब झाडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने अधिकारी कर्मचारी वर्गात सुध्दा नाराजी व्यक्त करीत ही परंपरा योग्य नसल्याची चर्चा सुरु झाली आहे.