नुकसान भरपाईच्या पाच कोटींचे वाटप सुरु-आ.विजय रहांगडाले

0
7

तिरोडा-दि. २६: अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे तिरोडा तालुक्यातील शेतकèयांचे मोठे नुकसान झाले होते. नुकसान भरपाई मिळण्यासाठी आ. विजय रहांगडाले यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून राज्य शासनाने तिरोडा तालुक्यासाठी ४ कोटी ९५ लाख रूपये मंजूर केले आहे. नुकसान ग्रस्तांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम तत्काळ जमा करण्याचे निर्देश आ.रहांगडाले यांनी महसूल विभागाला दिले आहेत.शेतकèयानी ८ दिवसात आपले बँकेचे खाते तपासून घ्यावे असे आवाहन आमदार रहागंडाले यांनी केले आहे.
फेब्रुवारी व मार्च २०१५ मध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीच्या तडाख्यात तिरोडा तालुक्यातील शेतकरी सापडले होते. जिरायती व बागायती पिकांचे मोठेच नुकसान झाले होते. तालुक्यातील १२५ गावांना याचा फटका बसला होता. तर १२ हजार २९९ शेतकèयांच्या पिकांचे नुकसान झाले होते.जिरायती शेतातील गहू, हरभरा, जवस व इतर तसेच बागायती पिकांमध्ये भाजीपाला आदी पिके संपूर्ण नष्ट झाली होती.
भरपाई त्वरित मिळण्यासाठी शेतकरी सतत पाठपुरावा करीत होते.याची दखल तिरोडा-गोरेगाव क्षेत्राचे आ. विजय रहांगडाले यांनी घेऊन राज्य शासनाकडून तिरोडा तालुक्यासाठी चार कोटी ९५ लाखांचा निधी मंजूर करून आणला.
अवकाळी पाऊस व गारपीट यात ज्यांच्या शेतातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले, अशा शेतकèयांना नुकसान भरपाई हेक्टरी १० हजार रूपये (एकरी चार हजार रूपये) दिले जात आहे. नुकसानग्रस्त शेतकèयांची यादी व त्यांना देय असणारी रकमेची माहिती ग्रामपंचायत कार्यालयाला पाठविण्यात आली आहे. ज्या ग्रामपंचायतीला यादी मिळाली नसेल त्यांनी त्वरित न्यावे, असे आ. विजय रहांगडाले यांनी सांगितले.
सर्वाधिक नुकसानग्रस्त भागात अर्जुनी क्षेत्राचा समावेश आहे. तसेच नुकसानग्रस्त गावांमध्ये घाटकुरोडा १९४ हेक्टर (१९.४० लाख), सोनेगाव १४७.२७ हेक्टर (१४.७२ लाख), चांदोरी (बु.) १२० हेक्टर (१२ लाख), कवलेवाडा ११४ हेक्टर (११.४० लाख), मेंढा १११ हेक्टर (११.१० लाख), परसवाडा ९० हेक्टर (नऊ लाख), गोंडमोहाळी ८१ हेक्टर (८.१० लाख), भजेपार ६१ हेक्टर (६.१० लाख) व सुकडी-डाकराम ६३.३६ हेक्टर (६.३४ लाख) एवढे रूपये मिळणार आहेत. सर्वात कमी नुकसान दर्शविण्यात आले, त्यात चोरखमारा ०.२० हेक्टर, भुराटोला १.२० हेक्टर, पुजारीटोला एक हेक्टर व भोंभोडी येथे २० हेक्टरचा समावेश आहे. भोंभोडी येथे नुकसानीचे प्रमाण कमी असले तरी लाभार्थी शेतकèयांची संख्या २०० आहे.