शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या अन्यथा आंदोलन

0
29

गोरेगाव ,दि.२७- महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा गोरेगावच्यावतीने आज गुरुवारला वन्यप्राण्यापासून शेतकर्याच्या शेतातील पिकाचे व जनावरांचे नुकसान होत असल्याने त्याचा मोबदला त्वरीत देण्यात यावे,अन्य़था आंदोलन करण्यात येईल या मागणीचे निवेदन गोरेगावचे वनपरिक्षेत्राधिकारी यांना देण्यात आले. तालुक्यातील पिंडकेपार, कन्हारटोला, जांभूळपाणी या गावातील शेतकऱ्याना वन्य प्राणी बिबट पासून भिती निर्माण झाली असून गावातील गाय, वासरू, शेळ्यांची शिकार करत आहे. तसेच रानडुक्कर मनुष्यांवर थेट हल्ला चढवीत असल्याने गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.अशावेळी त्यांची शेतकऱ्याना सहकार्य करुन लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे तर्ीव आंदोलन छेडण्यात येईल असे मनसे शहर अध्यक्ष यासीन शेख यांनी निवेदनात म्हटले आहे.यावेळी मनसे जिल्हाउपाध्यक्ष लेखूभाऊ राहांगडाले, तालुकाध्यक्ष शैलेश जांभूळकर, शहर उपाध्यक्ष राहुल नरोळे, प्रभाग अध्यक्ष गौरव दाते, गोल्डी सेलोकर, कुवर पटले, शुभम ठाकरे,राजू राहांगडाले, दुर्गेश थेरकर, छत्रपाल ठाकरे उपस्थित होते.