मनमर्जी तोडफोडीने इमारतीला धोका

0
17

अधिकाèयासह पदाधिकाèयांनी सुरू केली तोडफोड
बांधकाम विभागातील उपअभियंत्याचा प्रताप

गोंदिया,दि.२-कुठलीही इमारत तयार करतांना आधीच त्याचे नियोजन केले जाते.केले गेले नसेल तर इमारत तयार झाल्यानंतर त्यात काही सुधारणा करतानाही तांत्रिक बाबींचा विचार करूनच नवे बांधकाम केले जाते.परंतु सध्या गोंदिया जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये कुठल्याही तांत्रिक बाबींचा विचार न करता मुख्य इमारतीच्या qभतीना तोडण्याचे काम जोमात सुुरु आहे.यामध्ये पदाधिकारीच समोर आहेत असे नव्हे तर खुद्द अधिकारी सुध्दा सहभागी झाले आहेत.यापूर्वी चुकीच्या नियोजनाने केलेल्या तोडफोडीचा फटका कुणाला बसला असेल तर अर्थ व बांधकाम सभापतीचे जुने जे कक्ष आहे त्या कक्षाला.वरच्या माळ्यावर केलेल्या तोडफोडीचा परिणाम नेहमीच या कक्षात वरच्या माळ्यावरील पाण्यामुळे गळती लागायची.या सर्व गोष्टी होऊनही उपविभागीय अभियंता शुक्ला व त्यांचे सहाय्यक अभियंत्याला तांत्रिक बाबी कशा लक्षात आल्या नाही हेच कळेना.प्रशासकीय इमारतीची कुठलीही तोडफोड असो की रंगरगोंटी फक्त फुलचूरच्या एका कंत्राटदाराला हाताशी धरून कुठलाही प्रशासकीय करारनामा न करता फक्त बैठकीत मंजूर केलेला या मुद्यावरच जिल्हा निधीची बंदरबाट कसे करता येईल याचे चांगले उदाहरण पंचायत राज समितीच्यावेळी बघावयास मिळाले होते.तीच परिस्थिती सध्या पदाधिकारी व अधिकारी यांच्यासाठी करण्यात येत असलेल्या तोडफोडीमध्ये दिसून येत आहे.शिक्षण व आरोग्य सभापती यांच्यासाठी असलेल्या कक्षावर अर्थ व बांधकाम सभापतींनी बसल्याने आरोग्य व शिक्षण सभापतींना काही दिवस कक्षाविनाच राहावे लागले.कारण त्यांना जे कक्ष देण्यात आले ते खरोखरच बसण्याच्या लायकीचे नव्हते.अखेर त्यांनी दठ्या दिल्यानंतर त्यांच्यासाठी तळमजल्यावरील पाणी पुरवठा विभागाच्या जुन्या कार्यालयात नवीन कक्ष तयार करून देण्यात आले.परंतु अर्थ व बांधकाम सभापती ज्या उपाध्यक्षांच्या कक्षात बसल्या त्या कक्षातही आजच्या घडीला एंटीचेंबर छोट असल्याचे कारण पुढे करून तोडफोड सुरू करण्यात आली आहे.प्रशासकीय इमारत जेव्हापासून ही तयार झाली तेव्हापासून या कक्षात बसलेल्या उपाध्यक्षांना विशेष म्हणजे भाजपचे विद्यमान जिल्हाअध्यक्ष विनोदभाऊ यांनाही ते चेंबर छोट वाटले नाही.परंतु विद्यमान उपाध्यक्षांना ते एकदमच लहान वाटू लागले आणि त्यांनीही आपल्याकडेच बांधकाम व अर्थ विभाग असल्याने कोण जाब हा विचार करूनच आपल्या एंटी चेंबरला मोठे करण्याचे निर्देश दिल्याने आज त्याठिकाणी तोडफोड सुरू केली आहे.उपाध्यक्ष मॅडमनी तोडफोड केल्याचे लक्षात आल्यावर मिळालेल्या सूत्राच्या माहितीनुसार कृषी व पशुसंवर्धन सभापतींनी सुध्दा आपले एंटी चेंबर लहान आहे ते सुध्दा बाजूला असलेल्या खोलीची qभत तोडून मोठे करण्यात यावे अशी मागणी केल्याचे समोर आले आहे.
यातच अर्थ विभागाने तर आपल्या मनमर्जीने आपल्या विभागाची सज्जा जिल्हानिधीच्या पैशातून करून वाट लावली आहे.त्याच आधारावर आता सामान्य प्रशासन विभागात सुरू आहे.अधिकारी यांच्यासाठी सुध्दा त्यांच्या कार्यालयाला लागून शौचालयाची व्यवस्था असणे चुकीचे नाही.परंतु ते नसेल आणि नव्याने तयार करायचे असेल तर आपण ज्या इमारतीच्या qभतीला घेऊन ते तयार करणार आहोत त्याचे तांत्रिक नियोजन करायला हवे.पण सामान्य प्रशासन विभागाचे प्रमुख पुराम यांच्या कक्षाशेजारी तयार करण्यात आलेले शौचालय व वॉसरुमकडे बघितल्यास कुठेही तांत्रिक ताळमेळ दिसून येत नाही.वास्तविक शौचालयासाठी तोडफोड करतांना मुख्य qभत आणि कॉलम या सर्वांचा विचार करायला गेला पाहिजे होता.परंतु ते न केले गेल्याने आज नव्याने तयार करण्यात आलेल्या बांधकाम म्हणजे कुठल्या झोपडपट्टीवाल्याच्या मेंदूतून साकारलेले बांधकाम म्हणण्याची वेळ जनतेसमोर आली आहे.