आमगाव – देवरी मार्ग दीड तास रोखला
सालेकसा,दि. ५ : सोनारटोला येथील आरती लर्इंद्र बारसे (वय १८) हिला जाळल्यानंतर तिचा म़ृतदेह विहिरीत टाकण्यात आला. या घटनेला १५ दिवसांपेक्षा अधिक कालावधी लोटला तरी, आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले नाही. त्यामुळे या घटनेचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा, आरोपीला त्वरित अटक करण्यात यावी, या मागण्यांसाठी शनिवारी (ता. ५) भाजप महिला मोर्चा व देवरी तालुका ‘हिला आयोगाच्या बॅनरखाली आमगाव- देवरी मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी दीड तास रस्ता रोखून धरल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.
सोनारटोला येथील आरती लर्इंद्र बारसे (वय १८) हिचा १८ ऑगस्ट रोजी विहिरीत संशयास्पदरीत्या म़ृतदेह आढळून आला. तिला पहिल्यांदा जाळले असावे, त्यानंतर विहिरीत टाकले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे. आरतीचे आईवडील हे कामानिमित्त रायपूर येथे वास्तव्यास असल्याने आरती ही आपल्या आजीसोबत सोनारटोला येथे राहत होती. घटनेच्या दिवशी आरतीची आजी ही गावात दुसèया व्यक्तीकडे काही कामानिमित्त गेली होती. आरती ही घरी एकटी आपल्या अभ्यासात व्यस्त होती. आरतीची आजी घरी परतल्यानंतर तिला आरती घरात दिसली नाही. यामुळे तिने शेजाèयांच्या मदतीने तिची शोधाशोध केली. परंतु, ती कुठेही आढळली नाही. सायंकाळी सात वाजताच्या सु‘ारास अंगणातील विहिरीत आरतीचा ‘ृतदेह गावकèयांना तरंगताना दिसला. काही लोकांनी घरात डोकावले असता ‘धल्या खोलीत आरतीची पुस्तकेही अस्ताव्यस्त पडलेली दिसली. याशिवाय घरात काही कपडे जळालेल्या अवस्थेत आणि त्या कपड्यांना मासांचे तुकडे चिकटलेले दिसले. दरम्यान, काही वर्षांपूर्वी गावातील एका युवकाशी आरतीचे कडाक्याचे भांडण झाल्याचे बोलले जाते. तसा आरोपही करण्यात आला. परंतु, पोलिसांनी थातूरमातूर चौकशी करून प्रकरण रेंगाळत ठेवले आहे. पोलिस या प्रकरणाकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप करीत भाजप महिला मोर्चा व देवरी तालुका महिला आयोगाच्या कार्यकत्र्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. शनिवारी सकाळी १० वाजता आमगाव- देवरी मार्गावरील तेढा ङ्काट्यावर रास्तो रोको आंदोलन करण्यात आले. सोनारटोला प्रकरणाची सीबीआय‘ाङ्र्कत चौकशी करण्यात यावी, आरोपीला त्वरित अटक करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांनी रेटून धरली. या आंदोलनाचे नेतृत्व माजी सभापती सविता पुराम व सविता बेदरकर यांनी केले. आंदोलनात गावातील शेकडो महिला – पुरूष सहभागी झाले होते. दरम्यान, आमदार संजय पुराम, जिल्हा पोलिस अधीक्षक शशीकुमार मीना, नायब तहसीलदार आंदोलनस्थळी हजर झाले. त्यांनी प्रकरण सीबीआयला सोपविण्यात येईल, असे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.