संजय गांधी निराधार योजनेच्या तालुका समित्यांचे गठण

0
21

गोंदिया दि.8 : जिल्ह्यातील चार तालुक्यासाठी शासनाच्या संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष व सदस्यांची निवड करण्यात आली.
यात गोंदिया तालुक्यासाठी अध्यक्षपदी पालकमंत्र्यांनी भाऊराव उके यांची शिफारस केली. तर सदस्यपदी महिला अशासकीय प्रतिनिधी म्हणून परसवाडा येथील नेहा शुक्ला, अनुसूचित जाती-जमाती अशासकीय प्रतिनिधी म्हणून आसोली येथील फिरोज बन्सोड, सर्वसाधारण प्रवर्गातील अशासकीय प्रतिनिधी म्हणून शिरपूरचे संतोष चव्हाण, विमुक्त जाती भटक्या जमाती अशासकीय प्रतिनिधी म्हणून तेढवाचे छत्रपाल तुरकर, महेंद्र बघेले व अपंग प्रवर्गातील अशासकीय प्रतिनिधी म्हणून परमेश्‍वर ठाकरे यांची निवड करण्यात आली. अर्जुनी-मोरगाव तालुक्यासाठी अध्यक्षपदी रघुनाथ लांजेवार तर सदस्यपदी महिला अशासकीय प्रतिनिधी म्हणून अर्जुनी मोरगाव येथील शशीकला भाग्यवंत, अनुसूचित जाती-जमाती अशासकीय प्रतिनिधी म्हणून तिडका येथील आसाराम मेश्राम, सर्वसाधारण प्रवर्गातील अशासकीय प्रतिनिधी म्हणून गौरनगरचे डॉ. सुबोध बारई, विमुक्त जाती भटक्या जमाती अशासकीय प्रतिनिधी म्हणून इंजोरीचे लायकराम भेंडारकर, तुकुमनारायणचे आनंदराव तिडके व अपंग प्रवर्गातील अशासकीय प्रतिनिधी म्हणून केशोरी सुशील गहाणे यांची निवड करण्यात आली.
देवरी तालुक्यासाठी अध्यक्षपदी पुराडाचे श्रीकृष्ण हुकरे तर सदस्यपदी महिला अशासकीय प्रतिनिधी म्हणून देवरीच्या कौशल्या कुंभरे, सर्वसाधारण प्रवर्गातील अशासकीय प्रतिनिधी म्हणून देवरीचे प्रवीण दहिकर, विमुक्त जाती भटक्या जमाती अशासकीय प्रतिनिधी म्हणून घोनाडीचे शालीक गुरूनुले, वडेगावचे राजकुमार रहांगडाले व अपंग प्रवर्गातील अशासकीय प्रतिनिधी म्हणून देवरीचे दिलीप पाठक यांची निवड करण्यात आली. सालेकसा तालुक्यातील अध्यक्षपदी बोदलबोडीचे इसराम बहेकार, सदस्य महिला अशासकीय प्रतिनिधी म्हणून कारूटोल्याच्या संगीता शहारे, अ.जा.ज. अशासकीय प्रतिनिधी म्हणून पिपरियाचे विजय सोयाम, सर्वसाधारण प्रवर्गातील अशासकीय प्रतिनिधी म्हणून विनोदकुमार जैन, विमुक्त जाती भटक्या जमाती अशासकीय प्रतिनिधी म्हणून गदीप्रसाद भगत, चैनलाल लिल्हारे आदींचा समावेश आहे.