पवनी दि.8 : पवनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस सर्मथित शेतकरी विकास पॅनेलचे १९ पैकी ११ सदस्य विजयी झाले. या निवडणुकीत काँग्रेस सर्मथित सहकार पॅनेलचे सात संचालक निवडून आले तर भाजपा – शिवसेना सर्मथित परिवर्तन पॅनेलचा सफाया झाला आहे.
शेतकरी विकास पॅनेलचे सेवा सहकारी संस्था गटातून सर्वसाधारण जागेकरीता होमेश वैद्य, डॉ.किशोर मोटघरे, कुंडलीक काटेखाये, राजेश मेंगरे, हंसराज गजभिये, महिला गटातून सुधा ईखार, मागासवर्गीय गटातून शंकर फुंडे, विमुक्त भटक्या जमाती गटातून गोविंदा चाचेरे, ग्रामपंचायत गटातील अनुसूचित जाती प्रवर्गातून चेतक डोंगरे, व्यापारी अडतीया गटातून तोमेश्वर पंचभाई, तोलाई हमाल गटातून सोमेश्वर बावनकर हे ११ संचालक निवडून आले.
सहकार पॅनेलचे सेवा सहकारी संस्था गटातून सर्वसाधारण जागेकरीता अशोक मोहरकर, गोपाल सावरबांधे, महिला गटातून नीला पाथोडे, ग्रामपंचायत गटातून सर्वसाधारण जागेकरीता करीता अनिल बावनकर, माणिक ब्राम्हणकर, आर्थिक दुर्बल गटातून शारदा वाघ, व्यापारी अडतीया गटातून तुलाराम पंचभाई हे ७ संचालक निवडून आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विलास देशपांडे व सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून अनुप भांडारकर यांनी काम पाहिले. निकाल घोषित झाल्यानंतर शेतकरी विकास पॅनेलतर्फे विजयी उमेदवारांची मिरवणूक काढण्यात आली. रॅलीमध्ये जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजेश डोंगरे, दूध संघाचे अध्यक्ष विलास काटेखाये यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.