गोंदिया,दि.16-भारतरत्न सर विश्वेश्ररय्या मोक्षगुडंम यांचा जन्मदिन अभियंता दिन म्हणून साजरा करण्यात येतो.मंगळवार १५ सप्टेबंरला दक्षिण मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता ई.पी.शिवशंकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गोंदिया जिल्हा अभियंता संघटनेच्या वतीने अभियंता दिन कार्यक्रम येथील डब्लीगं ग्राऊंडस्थित मीलन सभागृहात पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यकारी अभियंता मुकेश राणे होते.यावेळी राणे यांनी पुढच्या वर्षाकरीता डी.यु.रहागंडाले यांना अभियंता संघटनेच्या कार्यकारीणीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली.14 सप्टेंबरला सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.पाहुण्याच्या हस्ते सेवानिवृ्त्त अभियंते,अभियंता परिवारातील गुणवंत विद्याथीर् यांचा सत्कार करण्यात आला.नियोजित अतिथी पालकमंत्री राजकुमार बडोले हे या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले.मंचावर वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता के.ए.चव्हाण,सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, कार्यकारी अभियंता नरेंद्र ढोरे,कार्यकारी अभियंता निखाडे,प्र.कार्य.अभियंता संजय कटरे,यांच्यासह रेल्वेचे मुख्य अभियंता व इतर मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इंजी. वासुदेव रामटेककर,टी.एच.तुरकर,गोर्वधन बिसेन, अजय सेंगर,भुपेश तुरकर,योगेश शुक्ला,शरद क्षत्रिय,शैलेष कटरे,देशपांडे,अमित तुरकर आदींनी सहकार्य केले.