शतकोटी वृक्षलागवड योजनेचा फज्जा

0
9

साकोली दि.१९: शासनाच्या शतकोटी वृक्षलागवड योजनेचा पावसाअभावी फज्जा उडालाअसून शासनाला यावर्षी ही योजना गुंडाळून ठेवण्याची वेळ आली आहे. पावसाने दडी मारल्याने धानपिकानी माना टाकल्या आहेत. अशा स्थितीत महसुल व वनविभागाने शतकोटी वृक्षलागवड योजनेअंतर्गत जिल्ह्यासाठी निर्धारित केलेले वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट कसे पुर्णहोणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
महसूल आणि वनविभागाने शतकोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत राज्यासाठी ६ कोटी ४४ लाख ५६ हजार वृक्षांच्या लागवडीचे नियोजन केले आहे. त्यासाठी प्रत्येक विभागाला वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. त्यामध्ये वनविभाग, सामाजिक वनिकरण विभाग, ग्रामविकास व जिल्हा परिषदवार कृषी विभाग व इतर विभागाचा यात समावेश आहे. हे उद्दिष्ट विभाग व जिल्हानिहाय देण्यात आले आहेत.

शतकोटी योजनेचे उद्दिष्टे पूर्णझाले तरी लावलेली झाडे जगणार कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशाही परिस्थितीत महसुल व वनविभागाने शतकोटी वृक्षलागवड योजनेअंतर्गत राज्यात ६ कोटी ४४ लाख ५६ हजार झाडे लावण्याचे नियोजन करुन आराखडा तयार केला आहे. हा आराखडा जिल्हानिहाय व विभागनिहाय असून पावसाळा संपण्यापूर्वीही झाडे लावली जाणार आहेत. त्यासाठी शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था सहकारी संस्थाचा मदतीने हे उद्दिष्ट पूर्णकरावयाचे आहे.