युवक काँग्रेसचा मोर्चा, २४ जणांचे मुंडण

0
10

वर्धा दि.१९: तालुक्यातील तळेगाव(टा.) ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचारप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आमरण उपोषण आंदोलनादरम्यान शुक्रवारी आंदोलकांसह २४ जणांनी मुंडण करून आंदोलनाची धार तीव्र केली आहे.
देवळी-पुलगाव विधानसभा युवा काँग्रेसने मोर्चाच्या माध्यमातून जि.प.वर धडक दिली. शिष्टमंडळाने जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी संजय मिना यांची घेतली. याप्रसंगी सीईओ मिना यांनी चौकशी अहवाल दुपारपर्यंत जाहीर करण्याची ग्वाही दिली होती, असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.
मोर्चात माजी जि.प. अध्यक्ष विजय जयस्वाल, कॉग्रसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष सुनील कोल्हे, जि.प. गटनेते मारेश्‍वर खोडके, जि.प. सदस्य मनोज चांदुरकर, मोहन शिरोडकर, निलिमा दंढारे, वर्धा पं.स. सभापती कुंदाताई भोयर, पुलगाव नगराध्यक्ष मनीष साहु, माजी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेश तेलरांधे, लोकसभा महासचिव सुधीर वसु, जावेद खान, एनएसयुआय अध्यक्ष हितेश इंगोले, विधानसभा महासचिव मोहन नावाडे, धिरज भोयर, सचिन गुप्ता, सोनू गावंडे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
उपोषणात माजी सरपंच माणिकराव भोयर यांनी आज सहभाग नोंदविला. मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनीही उपोषण मंडपाला भेट घेऊन उपोषणकर्त्यांची मागणी समजून घेतली. यानंतर त्यांनीही आंदोलनाला पाठींबा जाहीर केला आहे.