पालकमंत्री सोमवारला गोंदियात

0
11

गोंदिया,दि.१९ : पालकमंत्री राजकुमार बडोले हे दोन दिवसाच्या जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे. २० सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता भंडारा येथून मोटारीने सडक अर्जुनीकडे प्रयाण व मुक्काम. २१ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता सडक/अर्जुनी येथून मोटारीने गोंदियाकडे प्रयाण. सकाळी ११ ते दुपारी १२ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात कटंगीकला कलपाथरी प्रकल्पासंदर्भात जिल्हाधिकारी, तिरोडा उपविभागीय अधिकारी, कार्यकारी अभियंता मध्यम प्रकल्प विभाग गोंदिया, गोरेगाव तहसिलदार व कलपाथरी संघर्ष समितीचे पदाधिकारी यांचेसमवेत बैठक. दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत प्रधानमंत्री मुद्रा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, जन-धन योजना यासंबंधी जिल्हाधिकारी, अग्रणी जिल्हा प्रबंधक, इतर प्रमुख बँकांचे व्यवस्थापक यांच्यासमवेत बैठक. दुपारी १ ते दुपारी २ या वेळेत गोंदिया व तिरोडा नगरपरिषद येथील दलित वस्ती कामासंबंधी जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी गोंदिया व तिरोडा यांच्यासमवेत बैठक. दुपारी २ ते ३ वाजेपर्यंत पालकमंत्री कार्यालय येथे विविध योजनांची अंमलबजावणी व नव्याने सुरु करण्यात आलेल्या विकास कामासंदर्भात कार्यकारी अभियंता गोंदिया पाटबंधारे विभाग, स्थानिक स्तर पाटबंधारे विभाग, लघु पाटबंधारे विभाग जि.प., बाघ इटियाडोह पाटबंधारे विभाग, गोंदिया पाटबंधारे विभाग (यांत्रिकी) यांच्याशी चर्चा. दुपारी ३ ते सायंकाळी ४ पर्यंत जिल्हा भाजप कार्यालय जागेसंबंधी, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व नगर पंचायत निवडणूक संबंधी भाजपा जिल्हाध्यक्ष व सर्व भाजपा तालुका प्रमुख यांच्यासमवेत बैठक. सायंकाळी ४.१५ वाजता गोंदिया येथून कोहमारा मार्गे नागपूरकडे प्रयाण करतील.