चार दिवसीय प्रशिक्षण

0
7

गोरेगाव दि.११-: चार दिवसीय प्रशिक्षण पं. स. गोरेगावच्या सभागृहात पं.स. सभापती दिलीप चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले. यावेळी अतिथी म्हणून उपसभापती सुरेंद्र बिसेन, गटविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे, सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, जि.प.सदस्य विश्‍वजीत डोंगरे, पं.स. सदस्य केवल बघेले, पुष्पराज जनबंधू, पं.स. सदस्य रामाजी चज्रे, पं.स. सदस्य ललीताताई बहेकार, लिना बोपचे, माधुरी टेंभरे, राणी रहांगडाले, अल्का काठेवार उपस्थित होते. सदर प्रशिक्षणास सर्व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, ग्राम रोजगारसेवक, कृषी सहायक, समन्वयक संसाधन व्यक्ती, सुशिक्षित बेरोजगार, तांत्रिक अधिकारी होते. त्यांना प्रशिक्षित करुन गावागावात भरीव सहकार्यातून मग्रारोहयोच्या कामांचे नियोजन करायचे आहे. या माध्यमातून अध्यक्ष व सभापती यांनी पंचायत समितीतील सर्व जनतेला सहभागी होण्याचे आवाहन केले. संचालन रा.ग्रा.जीवनोन्नती योजनेचे तालुकासमन्वयक जे.एम. बिसेन, प्रास्ताविक जी.टी.सिंगनजुडे, आभार एच.आर. कटरे यांनी मानले.