पार्किंगच्या जागेवर होणार रासगरबा

0
9

पार्किंगसाठी ओरडणार्यांचा खरा चेहरा उघड

बेरार टाईम्स विशेष
गोंदिया,दि.१०-गेल्या काही वर्षापूर्वी एका आमदाराने गोंदिया शहरात बाहेरगावावरूनच नव्हे तर शहरातील विविध भागातून मुख्य मार्केट परिसरात व बाजारात येणाèया वाहनांना ठेवण्यासाठी पार्किगंची सोय नाही,हा मुद्दा उपस्थित केला होता.मुद्दा उपस्थितच केला नव्हे तर गोंदिया शहर पोलीस ठाणे मागे असलेल्या पोलीस वसाहतीवरील जागेवर त्या आमदाराची नजर गेली आणि तीच जागा पार्किंगसाठी हवा हा अट्टाहास धरून बसले.शेवटी त्या आमदाराच्या पक्षाचीच महाराष्ट्रात सरकार असल्याने त्या सरकारने ती जागा अखेर पोलीस विभागाच्या विरोधानंतरही पार्किंगसाठी नगरपरिषदेला हस्तातरींत करण्यात आली.वास्तविक त्यानंतर मोडकळीस आलेले क्वार्टस मोडून ती जागा सपाट करण्यात आली.त्यानंतर तिथे सध्या वाहने ठेवण्यास सुरवात झाली.पालिकेने अद्याप त्या जागेवर पार्किंग प्लाझा बनविण्यासाठी पुढाकार घेतला नसला तरी बाहेरून बाजार भागात येणारी वाहने तिथे हमखास ठेवून बाजारात गर्दी कमी होण्यास सुरवात झाली होती.असे असले तरी कधी कधी ती पार्किंगची जागा फक्त त्या शेजारी असलेल्या एका विशेष समाजभवनातील कार्यक्रमात येणाèया वाहनासांठी आणि त्या भागात असलेल्या नेत्यांच्या घराकडे वाहने ठेवायला जागा नसल्याने त्यासाठीच तर ही मागणी रेटून धरण्यात आली नव्हती ना अशी कुजबुज आजही अनेक नागरिकांच्या मनात आहे.असो परंतु आता त्या पार्किंगच्या जागेवर वाहने राहणार नाहीत तर पुढचे १० ते १२ दिवस एका मंडळाच्यवतीने रासगरबा खेळण्यासाठी ही जागा आपल्या ताब्यात घेऊन तिथे मंडप लावण्यास सुरवात करण्यात आली आहे.विशेष जे आमदार पार्कींगला जागा नाही असे ओरडत होते त्यांना मात्र आता त्या जागेवर रासगरबा खेळ होतोय त्याचा त्रास नाही.या कालावधीत त्या भागात येणारी वाहने कुठे ठेवली जातील याचा अजूनही नियोजन नाही.असे असले तरी पुढच्या वर्षी सुध्दा सदर मंडळ आम्ही गेल्यावर्षी तिथे रासगरबा खेळविले आता तुम्ही आम्हाला थांबवू शकत नाही ही अट पुढे करून पुढच्यावर्षी सुधद पार्किंगच्या जागेवर ताबा करण्याचा प्रयत्न करतील अशा परिस्थितीत जेव्हा नगरपरिषदेला पार्किंग प्लाझा तयार करण्याची वेळ येईल तेव्हा सुधद हाच मुदद समोर येईल आणि तथाकथित नेते पालिकेला सुधद बरोबर आहे असे म्हणत पार्किगची जागा रासगरबा खेळण्यास देतील असेच चित्र भविष्यात दिसून येईल.
एकीकडे सिव्हिल लाईनच्या हुनमानमंदिरापासून दूर सामाजिक भवन तयार होत असतान आणि त्याचा मंदिर परिसराला त्रास नसतांना सुध्दा जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत लोक निवेदन द्यायले गेले म्हणे आम्हाला पार्किंगची अडचण निर्माण होणार आता शहर पोलीस ठाणे मागच्या पार्किंगच्याच जागेवर असे होत असेल तर काय असा प्रश्न यानिमित्ताने पुढे आला आहे.
विशेष म्हणजे नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी वाहुरवाघ यांना बेरार टाईम्सने सदर जागा रास गरबा खेळण्याकरिता दिली काय असे विचारले असता त्यांनी आपणास काहीच माहिती नसून तपासणी केल्यानंतरच सांगता येईल असे सांगून वेळ मारून नेली.