ओबीसीनो दुसèया स्वातंत्र्यासाठी सज्ज व्हा-इंजि. माळी

0
23

गोरेगाव,दि१३- इंग्रज मोगलांच्या काळात आमचा ओबीसी qहदू व त्यावेचा शुद्रसमाज गुलामीत तर होताच पण ब्राम्हणशाहीच्या वैदिक धर्माच्या दुहेरी गुलामीत जगत गेला. आज इंग्रज, मोगल तर गेले पण वैदिक ब्राम्हणशाहीच्या गुलामीतून मुक्त होण्यासाठीही ओबीसींनी सज्ज रहावे असे आवाहन कर्मवीर इंजि. अरqवद माळी यांनी ओबीसी सेवा संघद्वारे आयोजित प्रगतिशील जीवनासाठी वैज्ञानिक तंत्र व समाज व्यवस्था अभ्यास कार्यक्रमात केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष प्रा.बी.एम. करमकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संजीव रहांगडाले, राजेंद्र येळे, सौ. रसिला येळे उपस्थित होते. माळी पुढे म्हणाले की, मनुष्य हा मन व शरीर या दोन तत्त्वांनी बनलेला आहे. मनाला सुखी करण्यासाठी ज्ञान व शरीराला सुखी करण्यासाठी धनाची गरज असते. पण वैदिकाळापासूनच ज्ञान व धन वाटपावर आर्यब्राम्हणांचे नियंत्रण असल्यामुळे आजचा शेतकरी, ओबीसी, बहुजन समाज गुलामीत जीवन जगत आहे. वेदनिर्मिती करून त्यांनी ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र, अतिशूद्र ही वर्णव्यवस्था जन्माला घातली. नंतर पतंजली, भुमती भार्मवच्या मार्फत मनुस्मृतीतून जातिव्यवस्था जन्माला घातली. व माणुसकीला काळिमा फासणारे कायदे केले. आणि बहुसंख्य शूद्र, अतिशूद्र वर्गाला ज्ञानसत्ता, धनापासून वंचित ठेवून वरील वर्गाची सेवा करण्याची गुलामी लादली. याच व्यवस्थेला आज ते qहदूराष्ट्र म्हणून आर.एस.एस. या ब्राम्हण निर्मित संघटनेद्वारे संविधान नष्ट करून जातिवादी qहदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी प्रचार-प्रसार करीत आहेत. या सगळ्या विषमतावादी व्यवस्थेविरुद्ध बुद्ध, सम्राट अशोक, शिवाजी, फुले, शाहू, आंबेडकर या महापुरुषांनी संघर्ष करून माणूस म्हणून जगण्याचे अधिकार मिळवून दिले. पण शासन प्रशासनात ३० टक्के उच्च जातीय असल्यामुळे ओबीसींची जनगणना, आरक्षण, शिक्षण, शिष्यवृत्ती, नाकारत आहेत व ओबीसींना जातिधर्माच्या दंगलीत मारत आहेत. तेव्हा ओबीसींनी यांच्या धर्माची गुलामी नाकारून आपल्या अधिकारांसाठी लढा उभारावा असे आवाहन अरqवद माळ यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन सावन कटरे यांनी तर आभार श्याम फाये यांनी मानले. चौकलाल येळे, सुनील येळे, सोनू पटले, कैलास येळे, कमलेश फाये, ललित येळे, बाळु फाये, दादा लांजेवार, राकेश फाये, दिनदयाल कटरे, बंडू पटले यांनी यशस्वितेसाठी सहकार्य केले.