गोंदियातील भव्य उद्योग मेळाव्याला मुख्यमंत्री येणार

0
8

गोंदिया,दि.13-तांदुळनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोंदिया शहरात पहिल्यांदाच तांदूळ,दाळ मिलींग व कृषी उपयोगी मशीनरिवर आतंरराष्ट्रीय प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे.या प्रदर्शनीचे उदघाटन १६ ऑक्टोंबरला गोंदियाचे आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या मुख्य उपस्थितीत राईस मिलर्स असो.चे अध्यक्ष अशोक चम्पालाल अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.विशेष म्हणजे १७ ऑक्टोंबरला आयोजित प्रदर्शनातील चर्चासत्राला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रामुख्यांने उपस्थित राहणार आहेत.मेक इन इंडियाच्या धर्तीवर मेक इन महाराष्ट्र अंतर्गतच या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.शनिवार १७ ऑक्टोंबरला आयोजित चर्चासत्र व सत्कार समारंभाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्य अतिथी राहणार आहेत.सोबतच अर्थमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार,जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले,अन्न पुरवठा मंत्री गिरीश बापट,ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे,खासदार प्रफुल पटेल,खासदार नाना पटोले,आमदार राजेंद्र जैन,आमदार गोपालदास अग्रवाल,विजय रहांगडाले,संजय पुराम,जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे,नगराध्यक्ष कशिश जायस्वाल,भाजप प्रवक्ते गिरीश व्यास आणि भाजप जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.