‘त्याङ्क १९ तरूणी गोंदियातून तर १ नागपूरातून फरार

0
11

१९ ची रामनगर पोलीसात हरविल्याची नोंद

गोंदिया,दि.१४- प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी वाशी नवी मुंबई यांच्या आदेशन्वये अनैतिक व्यवसायात गुंतलेल्या २० तरुणी व महिलांचे पुर्नवसन व्हावे यासाठी पुर्नवसन व सुधार गृहात पाठविण्यात आलेल्या २० पैकी १९ तरुणी व महिला टी.बी.टोली येथे न्यू एनर्जी बहुउद्देशीय संस्था नागपुरच्यावतीने संचालित केल्या जाणाèया राष्ट्रीय उज्वला पुनवर्सन केंद्रातून पसार झाल्याप्रकरणी रामनगर पोलिसांनी हरविल्याची नोंद घेतली.मात्र १ तरुणी कुठून बेपत्ता झाली याचा कुठेच उल्लेख नाही.विशेष म्हणजे जेव्हा मुंबई येथील रेस्कु संस्था नागपूर रेल्वेस्थानकावरून या तरुणी व महिलांना गोंदियाला घेऊन येण्यासाठी निघाले,तेव्हाच नागपूर स्थानकावरून एक तरुणी पळाल्याची माहिती गोंदियाच्या जिल्हा महिला व बालविकास प्रकल्प कार्यालयाने दिली.
या संस्थेत पौर्णिमा रंगारी या अधिक्षिका म्हणून कार्यरत होत्या.घटनेच्या दिवशी त्या दुपारी २ वाजताच पुणे येथे जाण्यासाठी निघाल्या.त्यानंतर दुपारपाळीत असलेली एक महिला कर्मचारी ही सुध्दा रात्रपाळीतील महिला कर्मचारीची वाट न बघताच सायकांळी ५ वाजता निघून गेली.तर रात्रपाळीला येणारी महिला कर्मचारी ही आलीच नाही.अशातच
शनिवारी सायंकाळी त्या तरुणींनी पळण्याचा कट रचला व रात्री ८ वाजे दरम्यान या सुधारगृहात असलेला सुरक्षा रक्षक व क्लर्क योगेश गोरखडेला ओढणीने बांधून त्यांनी मागच्या दाराची कुंडी तोडून पळ काढला.परंतु अवघ्या पाच मिनिटातच आपण बाहेर आल्याची माहिती देणारा कर्मचारी गोरखेडने आरडाओरड करून परिसरातील जनतेची मदत का घेतली नाही,हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पसार झालेल्या या महिलात महाराष्ट्रातील ५,कोलकत्ता येथील १० बांगला देशातील २, बिहार व उत्तरप्रदेशाची प्रत्येकी एक या प्रमाणे एकूण १९ तरुणीचा समावेश आहे.
पोलिसांनी घातलेल्या विविध धाडी अंतर्गत अनैतिक व्यवसायात या तरुणी सापडल्या होत्या त्यांना न्यायालय समक्ष हजर केल्यानंतर न्यायालयाने यांचे पुर्नवसन करण्यासाठी या तरुणींना मुंबईच्या रेस्कू फांउन्डेशनला सोपविले होते.या फांउन्डेशनने या तरुणीच्या पुर्नवसनाची जवाबदारी न्यू.एनर्जी बहुउद्देशीय संस्था नागपूरच्या वतीने चालविल्या जाणाèया राष्ट्रीय उज्वला गृह टी.बी.टोली गोंदियला दिली होती.या १९ तरुणी ५ ऑक्टोबरला पोहचल्या मात्र त्या तरूणीनांही लक्षात आले की हे सुधारगृह फक्त नावापुरतेच आहे.सुधार गृह संचालित करण्यासाठी ज्या काही सुविधा असायला हव्यात त्या नव्हत्या. १९ तरुणींना आणले गेले त्यांचा देखरेखी साठी महिला पहारेकरी असायला हव्यात त्या नव्हत्या. इतर महिला कर्मचारी ही नव्हत्या टी.बी.टोली येथील खान यांच्या इमारतीत संस्थेने एक फॅमिली ब्लॉक भाड्याने घेऊन त्या ठिकाणी बोर्ड टांगून शासनाकडून फक्त अनुदान लाटण्यासाठीच सदर संस्था उभी केली असावी असा संशय आहे.नियमाप्रमाणे सदर तरुणीला सुधार गृहात आल्यानंतर रीतसर पोलीस स्टेशनला माहिती द्यावयास हवी होती.मात्र ती सुद्धा देण्यात आली नाही.गुन्हेगारी जगाशी संबधित असलेल्या १९ तरुणींना राहण्यासाठी ही योग्य जागा नव्हती.टी.बी.टोली परिसरातील नागरिकांनी संस्थेचा फक्त पाहिला मात्र आजपर्यंंत कधीच कार्यालय सुरू नव्हते,असे सांगितले.
या ठिकाणी आपले चांगल्या प्रकारे पुर्नवसन होऊ शकणार नाही यांची खात्री झाल्यामुळेच qकवा या तरुणीशी या एनजीओच्या लोकांनीच साटेलोटे केल्यामुळे या तरुणी पसार झाल्याचे बोलले जात आहे.विशेष म्हणजे सदर घटना झाल्याच्या दुसèयाच दिवशी इमारतीवरील राष्ट्रीय उज्वला गृह पुनर्वसन केंद्राचा बोर्ड काढून घेण्यात आल्याने परिसरात वेगळीच चर्चा आहे.
गोंदियाच्या रामनगर पोलिसानी मुली बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करून रामनगरचे ठाणेदार बाळासाहेब पवार यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक श्रीमती कोकाटे या तपास करीत आहेत.
विशेष म्हणजे या सुधारगृहाकडे बघितल्यास सुखसुविधांचा अभाव दिसून आला.व्यवस्थित राहण्याची सोय नसल्याने आणि पुनवर्सनासाठी आलेल्या महिलांना बंदिस्त सारखे ठेवण्याचाच प्रकार होता.या घटनेनंतर नागपूर येथील विभागीय महिला बाल विकास उपायुक्त श्री qशदे यांनी सोमवारला गोंदियात दाखल होऊन पाहणी केली.त्यावेळीही सुधारगृह हे बंदच होते.आज वृत्तपत्राच्या प्रतिनिधींनी जेव्हा प्रभारी जिल्हा महिला बालविकास अधिकारी नम्रता चौधरी यांना सुधारगृह दाखविण्याची विनंती केली.तेव्हा त्यांनाही संस्थेच्यावतीने अर्धा ते पाऊणतास ताटकळत ठेवले,शेवटी अधिकारी जात नसल्याचे बघून संस्थाचालक गोंडाने यांनी सुधारगृह दाखविले.ते बघितल्यावर पुनवर्सन योग्य व्यवस्था आणि सुविधा नसल्याचे चित्र समोर आले.त्यातच सुरक्षारक्षकसह क्लर्क असलेला योगेश खोरगडे याने पोलिसांना दिलेली माहिती आणि वृत्तपत्र प्रतिनिधीसोबंत बोलतांना दिलेल्या माहितीमध्ये विसगंती असल्याचे दिसून आले.या सुधारगृहात सीसीटीव्हीची सुध्दा व्यवस्था करण्यात आलेली नव्हती.जेव्हा या संस्थेला सुधारगृहात मुली पाठविण्याआधी पुणे येथील महिला बालकल्याण आयुक्त कार्यालयाने विचारणा केली तेव्हा मात्र सुविधा असल्याचा अहवाल येथील कार्यालयाने पाठविला होता.त्यामुळे कार्यालयाची त्यावेळची भूमिका सुध्दा संशयास्पद दिसून येत आहे.

सुधारगृह बंद करण्याचा अहवाल देणार-श्रीमती चौधरी
गोंदियातील टिबी टोली स्थित राष्ट्रीय उज्वला गृहात घडलेल्या प्रकारानंतर चौकशी करून सदर संस्थेचा सुधार व पुनवर्सन गृह बंद करण्यासंबधीचा अहवाल महिला व बालविकास उपायुक्त कार्यालयाला सादर करण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नम्रता चौधरी यांनी दिली.संस्थेत पहिल्यांदाच मुली व महिला आल्या होत्या.परंतु त्यांच्या देखरेखीसाठी पाहिजे तो महिला कर्मचारी वर्ग नसल्याचे आणि संस्थेचे कर्मचारी वर्गाशी नियोजन नसल्याचे आढळून आल्याचेही त्यांनी सांगितले.