ओलीत क्षेत्राची व्याख्या बदलणे आवश्यक-आ.रहांगडाले

0
19

तिरोडा,दि.१४,- तिरोडा तालुक्यातील सुमारे ३० हजार हेक्टर जमीन कृषी क्षेत्र असून त्यापैकी २३ हजार हेक्टर क्षेत्रात खरीप व रब्बी पीक घेतले जाते. मात्र ७ हजार हेक्टर क्षेत्र हे कोरडवाहू म्हणून ओळखले जाते. गेल्याा वर्षी धापेवाडा उपसा qसचन योजनेचे पाणी अधिक कृषी क्षेत्रापर्यंत वाढविण्यासाठी केलेल्या प्रयत्नाला यश मिळाले. परंतु त्याचवेळी शासनाच्या आणेवारी पद्धतीप्रमाणेच कृषी ओलीत क्षेत्र ठरविण्याची व्याख्या बदलण्याचेही गरज असल्याचे चित्र समोर आल्याची माहिती तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी दिली. भंडारा-गोंदिया जिल्हा लहान तलावाचे जिल्हे म्हणून ओळखले जातात. या तलावात १५ ते २० दिवसातच झालेल्या पावसाचे पाणी साचते. प्रत्येक तलावाची सिंचन क्षमता २५ वर्षापूर्वी जेवढी होती. आजही तेवढीच आहे. qकवा दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. परंतु महसूल विभागाच्या रेकॉर्डमध्ये शेतकèयांच्या सातबारावर ओलीत क्षेत्राचाच उल्लेख आढळून येतो. ओलीत क्षेत्राचे स्पष्ट अशी भूमिका उल्लेखीत केलेली नाही.ओलीत क्षेत्र म्हणजे बारा महिने, सहा महिने, तीन महिने की पंधरा दिवस अशी कुठेही नोंद नाही. परंतु शेतकèयांच्या शेतात १५ दिवस पाणी दिल्यानंतर महसूल व जलसंपदा विभाग ओलीत क्षेत्र दाखवून आणेवारी पद्धतसारखे ओलीत क्षेत्र ठरवून एक हास्यास्पद प्रकार तयार केला आहे. ओलीत क्षेत्राच्या नावावर फलोत्पादन व कृषी क्षेत्राच्या अन्य योजनांपासून शेतकरी वंचित राहू लागला आहे. त्यामुळे ओलीत क्षेत्राची सरकारने व्याख्या बदलवावी याकरिता येत्या हिवाळी अधिवेशनात सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे रहांगडाले यांनी म्हटले आहे.