दीड कोटीच्या गार्डनमध्ये केरकचèयाचा विळखा

0
10

उद्यान बचाव संघर्ष समितीची जिल्हाधिकाèयांना तक्रार

गोंदिया-नवेगावबांध येथील राष्ट्रीय उद्यान संकुल परिसरातील गार्डनच्या कामावर दीड कोटींचा खर्च होऊनही त्या गार्डनचे लोकार्पण न झाल्याने चार वर्षापासून धुळखात पडले आहे.
विशेष म्हणजे हे गार्डन राष्ट्रीय उद्यान परिसरात जिल्हा विकास योजनेच्या निधीतून तयार झाले आहे.आत्तापर्यंतच्या एकाही जिल्हाधिकाèयांने व उपवनसरंक्षकाने लक्ष न दिल्यानेच कोट्यावधीचा निधी पाण्यात गेल्यासारखा आहे.त्यामुळेच राष्ट्रीय उद्यान बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष रामदास बोरकर यांनी लोकशाही दिनी तक्रार करुन अपुर्ण बगीच्याचे पुर्ण काम दाखवून निधी लाटणाèया कंत्राटदाराची व त्यास मदत करणाèया अधिकाèयाच्या चौकशीची मागणी केली.या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी गार्डन बांधकामाच्या सर्वच प्रकियेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.चौकशी अहवाल आल्यानंतर दोषीवंर कारवाई करीत गार्डन लवकरात लवकर जनतेसाठी खुला करण्याला प्राधान्य असल्याचे आश्वासन समितीला दिले आहेत.
राष्ट्रीय उद्यानातील गार्डन बांधकामासोबतच सुशोभीकरणाच्या कामात कंत्राटदाराला तत्कालीन सहायक जिल्हा नियोजन अधिकारी यांनी मदत करीत निकृष्ट दर्जाच्या कामास सहकार्य केल्याबद्दल त्यांच्यासोबतच सन्नी कन्स्टड्ढक्शन भंडारा यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याकरीता तक्रार केली होती.या तक्रार अर्जात नवेगावबांध पर्यटन संकुल परिसरात झालेल्या कामाची माहिती, माहिती अधिकारात सहायक जिल्हा नियोजन अधिकाèयांनी दिली. त्यानुसार नवेगावबांध पर्यटन संकुल परिसरात १ कोटी ५० लाख रुपयेखर्च करून विकास कामे केल्याचे सांगण्यात आले.
विविध कामे २००९ मध्ये पूर्ण झाल्याचे दाखवून १ कोटी ५३ लाख २४ हजार ७३७ लाख रुपये खर्च झाल्याचे व १३ लाख ९० हजार ४०० रुपये कंत्राटदार व तज्ञ सल्लागाराचे देणे बाकी असल्याचे दाखविले आहे.
या निधीतून नवेगावबांध संकुल परिसरात विविध विकास कामे झाली, परंतु ६ वर्षे होऊन सुद्धा एकाही कामाचे लोकार्पण का केले गेले नाही. अशा प्रश्न उपस्थित करीत याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी लोकशाही दिनी संघर्ष समितीचे अध्यक्ष बोरकर यांनी केली होती.

जिल्हाधिकाèयांनी नेमली चौकशी समिती
संकुल परिसरातील गार्डन बांधकामाच्या अनियमिततेची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाèयानी कार्यकारी अभियंता (रो.ह.यो.), सा.बां.विभाग गोंदिया, उपविभागीय अधिकारी गोंदिया, जि.प. सार्व.बांधकाम उपविभाग सडक अर्जुनी, लेखाधिकारी, महसुल विभाग, आस्थापना शाखा, जिल्हाधिकारी गोंदिया यांची चौकशी समिती नेमली आहे. आता ही चौकशी समिती अहवाल द्यायला किती महिने वा वर्ष लावते याकडे लक्ष लागले आहे.येत्या हिवाळी अधिवेशनापुर्वी या गार्डनचे सुशोभीकरण संबधित कंत्राटदाराकडून करुन खुले होते काय हे बघावे लागणार आहे.