औरंगाबादच्या धर्तीवर जिल्ह्यात अंगणवाड्या निर्माण करणार

0
9

चंद्रपूर दि.१८: औरंगाबादच्या धर्तीवर चंद्रपूर जिल्ह्यातील आयएसओ प्रमाणित आदर्श अंगणवाड्या निर्माण करण्यात येणार असून अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या मानधनाच्या थकबाकीच्या १७८ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद येत्या हिवाळी अधिवेशनात निश्चितपणे करण्याचे आश्वासन वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा परिषदेतर्फे प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात शनिवारी आयोजित अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेचे उदघाटक म्हणून बोलतांना दिले.

कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय रसायन व खते राज्यमंत्री हंसराज अहीर होते, तर मंचावर आमदार नाना शामकुळे, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष कल्पना बोरकर, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, महिला व बालकल्याण सभापती सरिता कुडे, शिक्षण सभापती देवराव भोंगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव, महिला बालकल्याण समितीच्या सदस्य उपस्थित होते. जिल्हा परिषदेने तयार केलेल्या बाल आकार-२०१५ या पुस्तकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.