ग्रामीण रुग्णालय आमगाव येथे 2 सप्टेंबरला कर्करोग शिबिराचे आयोजन

0
19

गोंदिया,दि.30 : जिल्ह्यात कर्करुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रारंभिक लक्षणांकडे दुर्लक्ष
केल्यामुळे अनेकांना मृत्यूला सामोरे जावे लागते. वेळीच निदान झाल्यास कर्करोगापासून बचाव होऊ
शकतो. जनसामान्यांकरीता ग्रामीण रुग्णालय आमगाव येथे 2 सप्टेंबरला भव्य कर्करोग निदान शिबिराचे
आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टर्समार्फत मोफत तपासणी आणि निदान केले जाणार
आहे. 2 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत ग्रामीण रुग्णालय आमगाव येथे आयोजित
शिबिरामध्ये तपासणी करण्यात येणार आहे.
या शिबिरामध्ये लघवी आणि शौचच्यावेळी रक्त जाणे, वारंवार रक्तांची कमतरता होणे, थकवा तसेच
कमजोरी येणे, खोकलतांना रक्त येणे, स्तनभागी गाठ, मासिक पाळीच्यावेळी अती रक्तस्त्राव, गिळतांनी
त्रास, गळ्यात किंवा शरीराच्या इतर ठिकाणी गाठ तसेच तोंडात पांढरा चट्टा, लाल चट्टा, तोंडातील 15
दिवसापेक्षा जास्त असलेले व्रण (जखम), जिभेवर किंवा गालावरील गाठ इत्यादी लक्षणे आढळल्यास
तपासणी करुन निदान करण्यात येईल. शिबिरामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पीटल नागपूर येथील
कर्करोग तज्ञ चमू सेवा देणार आहेत.
तरी वरील लक्षणे आढळल्यास 2 सप्टेंबर रोजी आमगाव येथे आयोजित शिबिराचा लाभ घ्यावा, असे
आवाहन प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रशांत तुरकर व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन कापसे
यांनी केले आहे.