गोंदिया 1,भंडारा 1,बुलडाणा 21,चंद्रपूर 2,गडचिरोली 6,वाशिम जिल्ह्यात २ कोरोना बाधित

0
53

गोंदिया,दि.1 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून आज 1 सप्टेंबर रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात नविन एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. आज डिस्चार्ज रुग्णाची संख्या 1 आहे.आजपर्यंत 41,202 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. 40,497 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 2 आहे. 2 क्रियाशील असलेला बाधित रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 576 रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 99.27 टक्के आहे. बाधित रुग्णांचा मृत्यू दर 1.40 टक्के आहे तर डब्लिंग रेट 674.6 दिवस आहे.

जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या एक

भंडारा,दि.1 :- जिल्ह्यात आज एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाली असून आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या शून्य आहे. आज 375 व्यक्तींची चाचणी केली असता 01 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आली. जिल्ह्यात आता 07 सक्रिय रुग्ण आहेत.आज 00 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 58944 झाली आहे. आज एक व्यक्ती कोरोना बाधित आढळून आली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 60084 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.10 टक्के आहे. आतापर्यंत 04 लाख 49 हजार 860 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 60084 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 00, मोहाडी 00, तुमसर 01, पवनी 00, लाखनी 00, साकोली 00 व लाखांदुर तालुक्यातील 00 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 58944 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या 60084 झाली असून 07 क्रियाशील रुग्ण आहे. आज कोरोनाच्या 00 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 1133 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.10 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 01.89 टक्के एवढा आहे. जिल्ह्यात केवळ 0.01 टक्के सक्रिय रुग्ण आहेत. शासकीय व खाजगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राईब करावी असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.

बुलडाणा दि. 1 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1291 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1270 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 21 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 19 व रॅपीड अँटीजेन चाचणीमधील 2 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 284 तर रॅपिड टेस्टमधील 986 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1270 अहवाल निगेटीव्ह आहेत.पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : दे. राजा तालुका : पांगरी 1, दे. मही 1, चिंचखेड 1, नागणगांव 1, बुलडाणा शहर : 13, लोणार तालुका : कोयाळी दहातोंडे 4, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 21 रूग्ण आढळले आहे. तसेच आज 2 रूग्णांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.त्याचप्रमाणे आजपर्यंत 692224 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.

वाशिम जिल्ह्यात आणखी २ कोरोना बाधित-मालेगाव : शहरातील- २.,एकूण पॉझिटिव्ह – ४१७१२,ऍक्टिव्ह – १०,डिस्चार्ज – ४१०६३,मृत्यू – ६३८

चंद्रपूर- बुधवारी जिल्ह्यात 2 कोरोनामुक्त, 9 पॉझेटिव्ह ॲक्टिव रुग्णांची संख्या 46

गडचिरोली जिल्ह्यात 810 तपासण्यांपैकी 6 कोरोना बाधित तर कोरोनामुक्त संख्या निरंक

गडचिरोली, दि.01 : आज गडचिरोली जिल्हयात 810 कोरोना तपासण्यांपैकी 06 नवीन कोरोना बाधित
आढळून आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 30718 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 29935 आहे.तसेच
सद्या 37 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 746 जणांचा मृत्यू कोरोनामुळे
झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.45 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.12
टक्के तर मृत्यू दर 2.43 टक्के झाला.
नवीन 06 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 01, अहेरी तालुक्यातील 01, आरमोरी 00, भामरागड
तालुक्यातील 00, चामोर्शी तालुक्यातील 01, धानोरा तालुक्यातील 00, एटापल्ली तालुक्यातील 00, मुलचेरा
तालुक्यातील बाधितामध्ये 03, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 00, कोरची तालुक्यातील 00, कुरखेडा
तालुक्यातील बाधितामध्ये 00, तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 00 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त
झालेल्या रुग्णाची संख्या निरंक आहे.