गुजराती समाजाचे स्नेहमिलन

0
13

 

गोंदिया दि.१७: गुजराती राष्ट्रीय केलवणी मंडळ व गोंदिया गुजराती समाज यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रम आनंद पुरूषोत्तम वसंत गुजराती बालक मंदिरच्या सभाभवनात पार पडले.
यात विद्यार्थी व शिक्षकांनी भजन सादर करून भक्तीमय वातावरण तयार केले. पंडित चंद्रकांत व्यास यांच्या आशीर्वचनाने नवीन वर्षाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. सकाळी गुजराती राष्ट्रीय केलवणी मंडळ कार्यकारिणी समिती व ट्रस्ट बोर्डचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सर्वांना दिवाळी व नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. संचालन मंडळाचे सचिव जयेश पटेल यांनी केले. आभार सहसचिव अवनेश मेहता यांनी मानले.
यानंतर महिलांचा कार्यक्रम पार पडला. या वेळी वर्षा पटेल, अमीबेन पटेल, पूजा शाह, मीरा वडेरा, श्‍वेता वडेरा, सोनू वडेरा, उषा पटेल, भक्ती पटेल, धारा चरखावाला आदींनी सभेला संबोधित केले. संचालन किंजल मेहता यांनी केले. आभार पायल पटेल यांनी मानले. याप्रसंगी मोठय़ा संख्येने समाजबांधव व महिला उपस्थित होत्या.