रासप हा आपला मुळ आरक्षण उद्देश सोडून कधापी मागे हटणार नाही: माजी मंत्री महादेव जानकर

0
15

दौंड,दि.06- सर्व उपेक्षित समाजाला आरक्षण मिळावे हि रासप ची पहिल्यापासून भूमिका आहे, मुळात उपेक्षित समाजाला अपेक्षित ठिकाणी पोहोचवण्यासाठी रासपची स्थापना झाली आहे.
मुख्यमंत्री महोदयांनी केवळ ओबीसी आरक्षण संदर्भात बैठक ठेवल्याने त्याठिकाणी इतर विषयावर चर्चा करता आली नाही.मात्र रासप हा आपला मूळ उद्देश सोडून कदापिही मागे हटणार नाही, आरक्षण हे ज्याच्या हक्काचे आहे ते त्याला मिळावे हिच आमची भूमिका असल्याची माहिती रासपचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी म्हटले आहे.
मग तो धनगर असो मराठा असो मुस्लिम असो अथवा इतर मागासवर्गीय, सर्वांना त्यांचा हक्क मिळावा हिच आमची भूमिका आहे.