दोन माजी मंत्र्यांची मनरो शाळेला भेट

0
44

भंडारा-मनरो शाळेत सुरू असलेल्या व्यापारी गाडी बांधकामाच्या ठिकाणी माजी मंत्री भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे व आमदार परीनय फूके यांनी भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांचे निवेदन स्वीकारून काम थांबविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. पुरातत्व विभागाशी पत्र व्यवहार करण्याचा शब्दही यावेळी देण्यात आला. मागील महिनाभरापासून मनरो शाळेतील व्यापारी गाळे बांधकामाच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. माजी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येत पुकारलेल्या या आंदोलनात आता शाळेचे विद्यमान विद्यार्थी सुद्धा सहभागी झाल्याचे दिसते. व्यापारी गाळे बांधकामामुळे खेळाचे मैदान संपत आले आहे. त्यामुळे हे बांधकाम थांबून शाळेचे वैभव कायम राहावे यासाठी हा लढा सुरू आहे.
दहा दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनही करण्यात येत आहे. दरम्यान आज माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व आमदार परिणय फुके यांनी प्रत्यक्ष शाळेला भेट देत पाहणी केली. सुरू असलेल्या कामाबद्दल खंत व्यक्त करीत शाळेचे वैभव यामुळे नष्ट होत असल्याचे ते म्हणाले. यावेळी विद्यार्थ्यांनी एक निवेदन बावनकुळे यांना विद्यार्थ्यांची मागणी योग्य असून काम थांबविण्याच्या दृष्टीने आपण पूर्ण प्रयत्न करू असे आश्वासन विद्यार्थ्यांना देण्यात आले. पुरातत्त्व विभागाची पत्रव्यवहार करून पुरातन वास्तू म्हणून शाळेला कसे जतन करता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मागील महिनाभरापासून हे आंदोलन सुरू आहे. प्रशासनाकडून दुल्हन कर त्यांच्या बाबतीत कोणताही सकारात्मक निर्णय होताना दिसत नाही. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णया कडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान माजी पालकमंत्र्यांच्या येण्यामुळे आता तरी हा विषय मार्गी लागेल अशी अपेक्षा आंदोलन करणाऱ्यांना आहे.