जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकNयांना सरसकट मदत द्या – बबलू कटरे 

0
13
गोंदिया दि. २0: प्रामुख्याने धान उत्पादक असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील ८० टक्के जनता शेती व्यवसायावर अवलंबून आहे. यंदा शासनाने उभ्या हिरव्या धानपिकाची आणेवारी ८२ टक्के काढल्याने दुष्काळग्रस्त यादीतून गोंदिया जिल्हा बाद झाला. प्रत्यक्षात मात्र, पाऊस व्यवस्थीत पडला असला तरी मावा व तुडतुडा रोगाने संपूर्ण जिल्ह्यातील धानपिकाला उद््ध्वस्त केले. औषधांची फवारणी करून करून थकलेल्या बळीराजाला ५० टक्केही उत्पादन होणे अशक्य आहे. त्यामुळे केवळ आणेवारी न बघता रोगांमुळे झालेली नुकसानी लक्षात घेऊन जिल्ह्याला दुष्काळग्रस्त घोषित करून शासनाने शेतकNयांना सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष बबलू कटरे यांनी केली आहे.
 धानपिकावर रोगांचे आक्रमण झाल्याने धानाचे लोंब खाली गळून पडत आहेत. परिणामी शेतकNयांना उदरनिर्वाहासाठी धानही मिळणार नाही आणि जनावरांसाठी चारा (वैरण) देखील शिल्लक राहणार नाही. हजारो रुपयांची औषधी उधारी तत्वावर खरेदी करणारा शेतकरी कर्जाची परतपेâड करण्यात असमर्थ ठरला आहे. त्यामुळे शेवटचा पर्याय ठरलेल्या मायबाप शासनाने संवेदनशील होऊन जिल्ह्याला दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकNयांना सरसकट आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी कटरे यांनी केली आहे.