हलबा समाजाचा वधूवर परिचय मेळावा

0
33

भंडारा दि. २0:: गुणवत विद्यार्थीसत्कार समारंभ व उपवर वधु वर परिचय मेळावा गुरुदत्त मंगल कार्यालय येथे आदिवासी हलबा युवक समिती भंडारा तर्फे घेण्यात आला. हलबा समाजातील ४ थी शिष्यवृत्ती , १२ वी व १0 वी च्या परिक्षेत प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार समांरभ आयोजित करण्यात आला तसेच समाजातील विवाह योग्य उपवर वधुवरांचा परिचय मेळावा पार पडला. परिचय मेळाव्याकरिता विविध भागातून आलेल्या ३00 चे वर उपवरांनी आपली नाेंदण केली. तसेच उपस्थित उपवरांनी आपला परिचय दिला.
प्रास्ताविक समितीचे अध्यक्ष अनिल पराते यांनी केले. मंच संचालन संयोजक मनोहर हेडावु, योगेश हेडावु व मुख्य संयोजक o्रीराम लिमजे यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सुनिल रंभाड तर प्रमुख पाहुणे म्हणून भास्कर नंदनवार, नितीन धकाते उपस्थित होते. कार्यक्रमाला भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार रामचंद्र अवसरे यांनी धावती भेट दिली. सामुहिक सोहळा संपन्न झाल्यास मी विवाहित जोडप्यांना पाच हजार रुपये बक्षीस देण्याची घोषणा केली. कार्यक्रमासाठी अशोक सिलेकार, यादवराव नंदनवार, रामेश्‍वर लिमजे, सुरेश खोत व समाज बांधवांनी सहकार्यकेले.
सहभोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.