मुनगंटीवारांच्या नातेवाईकावर डाॅ.शरणागतचे गंभीर आरोप

0
9

नागपूर : सरकारी वैद्यकीय रुग्णालयातील वरीष्ठ डॉक्टर चक्क शवविच्छेदन अहवाल अर्थात पोस्टमॉर्टेम रिपोर्ट बदलायला लावून, अनेक बेकादेशीर कामं करून घेतात, असा आरोप करीत  नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील एका डॉक्टरने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ माजली.विशेष म्हणजे आत्महत्या करणाया डाक्टरने राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नातेवाईकावर यासंबधीचे आरोप केल्याने एकच खळबळ माजली आहे. नितीन शरणागत असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. डाॅ.शरणागत यांनी फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. मकरंद व्यवहारे यांच्यावर हे गंभीर आरोप केले आहेत. व्यवहारे हे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे नातेवाईक आहेत.

डॉ मकरंद व्यवहारे यांच्या या छळाला कंटाळून नितीन शरणागत यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. शरणागत यांनी काल संध्याकाळी वसतिगृहातील त्यांच्या रूममध्ये झोपेच्या औषधांचं अतिसेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. दरम्यान, प्रकरणाचे गांभीर्य ओळखत निवासी डॉक्टर्संनी पोलिसांकडे तक्रार नोंदविली आहे. आपल्यावर दबाव टाकून पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलून घेतले जात असत, असा जबाब डॉ. नितीन यांनी दिला आहे.मात्र,  पोलिसांनी हे प्रकरण तपासत ठेवत कोणत्याही गुन्ह्याची नोंद केलेली नाही.