स्त्रीरोग विशेषज्ञांची कार्यशाळा

0
20

गोंदिया,दि.१३ः स्त्रियांच्या आरोग्यविषयक विविध समस्या व आजाराबाबत मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने हॉटेल ग्रँडसीता येथे नुकतेच गोंदिया, भंडारा व बालाघाटच्या स्त्री विशेषज्ञांनी स्त्रियांच्या निरोगी व निरामय आरोग्याकरिता कार्यशाळेचे आयोजन केले. यावेळी मुंबई येथील डॉ.कैसाद दमानिया, डॉ.गीता बालसरकार, रायपूर येथून डॉ.तृप्ती नागरिया, नागपूर येथून डॉ.सुषमा देशमुख व डॉ.सुनील अंबुलकर उपस्थित होते. कार्यशाळेला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रवि धकाते यांनी स्त्रीरोग विशेषज्ञांना मार्गदर्शन केले. डॉ.राजेंद्र जैन व डॉ.चौरसीया निरीक्षक म्हणून उपस्थित होते. यावेळी डीवायएसपी रामदास राठोड व आयएमएचे अध्यक्ष डॉ.घनश्याम तुरकर यांनीही आपले मत व्यक्त केले.
कार्यशाळेला स्त्रीरोग विशेषज्ञचे अध्यक्ष डॉ.प्रणिता चिटणवीस, सचिव डॉ.रितु जैन, संस्था सचिव डॉ.संजय ज्ञानचंदानी, डॉ.शिल्पा मेश्राम, डॉ.श्वेता राणा, डॉ.मेघा रत्नपारखी, डॉ.शिरीष रत्नपारखी, डॉ.मोहन, डॉ.अनिता कोतवाल, डॉ.शेफाली जैन, डॉ.रानी जयस्वाल, डॉ.स्मिता आचार्य, डॉ.पटेल उपस्थित होते.