29.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ स्व.प्रा.श्याम ठवरे यांचे स्मृती प्रित्यर्थ रक्तदान शिबिराचे आयोजन

स्व.प्रा.श्याम ठवरे यांचे स्मृती प्रित्यर्थ रक्तदान शिबिराचे आयोजन

0
59

blank

सडक अर्जुनी:-(महेंद्र टेंभरे):- अर्जुनी मोरगाव तालुक्यातील पवनी/धाबे येथे दि.१०एप्रिल २०२२ रविवारला स्व.प्रा.श्याम ठवरे यांचे स्मृती प्रित्यर्थ भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन स्व.प्रा.श्याम ठवरे युवा फाऊंडेशन व मित्र परिवाराला तर्फे साईनाथ ब्लडबॅंक नागपूर च्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र पवनी/धाबे येथे करण्यात आले होते. सदर रक्तदान शिबिराचे उद्घाटन श्रीनारायण पाटील डोंगरवार यांचे अध्यक्षतेखाली,श्रीमती चंद्रकला श्यामराव ठवरे पं.स.सदस्या यांचे उपस्थितीत शारदा माता व स्व.प्रा. श्याम ठवरे यांचे प्रतिमेचे पूजन करून व फित कापून करण्यात आले. या कार्यक्रमाला कैलास खुणे मुख्याध्यापक, भामा चु-हे, गोवर्धन सयाम आदिवासी सेवक, कुमार दोनोडे, मनोहर धुर्वे, धूकेश ठाकरे, रमेश ठाकरे,प्रकाश शहारे रामदास कापगते उपस्थित होते. या रक्तदान शिबिरात १०२ लोकांनी सहभाग घेऊन रक्तदान केले. कार्यक्रमाचे संचालन शंकर ठवरे,व पाहुण्यांचे आभार डॉ. राहुल ठवरे यांनी मानले.

blank