अॅल्युमिनियमच्या कारखान्यात स्फोट, कामगाराचा मृत्यू

0
7

राजेंद्र दोनाडकर

भंडारा,दि.11- जिल्ह्यातील गोपीवाडा (मारेगाव)येथील महाराष्ट्र मेटल पावडर कंपनीत आज सकाळी ११ वाजेच्या दरम्यान स्फोट होऊन एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर कंपनी व्यवस्थपाना विरोधात कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली.

अॅल्युमिनियम पावडर बनविणाऱ्या या कंपनी मध्ये २५० स्थायी आणि ४०० अस्थायी कामगार आहेत. यापैकीच एक हरिदास इंगळे हा २७ वर्षाचा तरुण पहाटेच्या शिफ्ट वर कार्यरत असताना अचानकच कारखान्यात स्फोट झाला. यामध्ये हरिदास इंगळे या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्फोटाचं कारण अजूनही कळू शकले नाही.