32.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ मोहफुल वेचणाऱ्या इसमावर वाघाचा हल्ला

मोहफुल वेचणाऱ्या इसमावर वाघाचा हल्ला

0
57

सिंदेवाही –तालुक्यातील सरडपार चक येथील वाघ्याच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना ताजी असतांना पुन्हा दुसरी घटना उजेडात आली. सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील गुंजेवाही उपवनक्षेत्र पवनपार गावातील इसम सकाळच्या सुमारास मोहफूल वेचण्यासाठी गेला असता वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना उजेडात आली.
मृतक इसमाचे नाव सुरेश रामू लोनबले (५०) असे आहे.सिंदेवाही तालुक्यात वाघाची दहशत निर्माण झाली असून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करण्याची हाेत आहे.

blank