डॉ. नलिनी बोरकर-भगत यांच्या ग्रंथास राष्ट्रीय पुरस्कार

0
29

 तुमसर:- कला, वाणिज्य पदवी महाविध्यालय , पेट्रोल पंप, जवाहरनगर जि. भंडारा येथे समाजशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. नलिनी बोरकर-भगत यांच्या “बोद्धांच्या सामाजिक जाणीवा” या संदर्भ ग्रंथास मराठी समाजशास्त्र परिषदेचा प्रतिष्टेचा व मानाचा “जय जोशी संदर्भ ग्रंथ राष्ट्रीय पुरस्कार” प्राप्त झाला आहे. समाजशास्त्र परिषद ही समाजशास्त्र विश्वातील एक शिखर संस्था आहे. समाजशास्त्र विषयातील अध्ययन, अध्यापन व संशोधन कार्यासाठी कटिबद्ध असलेल्या व सध्या राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या मराठी समाजशास्त्र परीषदे द्वारा दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. सन २०२२ चा हा पुरस्कार डॉ. नलिनी बोरकर-भगत यांच्या ग्रंथास नुकत्याच रत्नागिरी येथे आयोजित मराठी समाजशास्त्र परिषदेच्या 31व्या राष्ट्रीय अधिवेशनात प्रदान करण्यात आला. डॉ. नलिनी बोरकर-भगत यांनी नागपूर विभागातील बोद्धांच्या सामाजिक जाणिवांचे अध्ययन पीएच. डी. साठी केले होते. याच संशोधनावर आधारित हा ग्रंथ आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. बोरकर यांचेवर अनेकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. त्यात प्रामुख्याने मराठी समाजशास्त्र परिषद चे अध्यक्ष डॉ. नारायण कांबळे, इंडीयन सोशिओलोजिक ल सोसायटी चे माजी सचिव डॉ. जगन कराडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र व साधने समितीचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप आगलावे, मराठी समाजशास्त्र परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ. सरोज आगलावे, मराठी समाजशास्त्र परिषदे चे माजी सचिव डॉ. दीपक पवार, मुंबई विद्यापीठाचे डॉ. प्रल्हाद जोगदंड, डॉ. बालाजी केंद्रे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा चे माजी समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एस. एल. गायकवाड, डॉ. स्मिता अवचार, डॉ. संजय साळुंखे, गोंडवाना विद्यापीठातील समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. धनराज पाटील, डॉ. स्निग्धा कांबळे, डॉ. अशोक सलोटकर, डॉ. श्रीनिवास पिलगुलवार, प्राचार्य डॉ. हेमराज लाड, डॉ. रंजना लाड, अमरावती विद्यापीठातील डॉ. किर्दक, डॉ. श्रीराम खाडे, डॉ. दया पांडे, सावित्रीबाई फुले विद्यापीठांतील डॉ. श्रुती तांबे, डॉ. संजय कोळेकर, डॉ. संजयकुमार कांबळे, नागपुर विद्यापीठातील डॉ. अशोक बोरकर, डॉ. धनंजय सोनटक्के, डॉ. राहुल भगत, डॉ. प्रदीप गजभिये ,डॉ. राजकुमार भगत, डॉ. प्रदीप मेश्राम ,डॉ. राजेंद्र काबंळे, प्रा.सुधाकर माटे , प्रा.राजु बुरीले, डॉ. बबन मेश्राम. डॉ. कमल तागडे, तुमसर येथील प्रा. राहुल डोंगरे, प्रा. राजेंद्र डांगे, डॉ. भीमराव टेंभुर्ने, इत्यादींनी डॉ. नलिनी बोरकर यांचे हार्दिक अभिनंदन केले.