खोडशिवणी येथे वीज वितरण कंपनीचे 33 केव्ही सब स्टेशन मंजूर

0
31

गोंदिया,दि.22ः- सडक अर्जुनी तालुक्यातील खोडशिवणी व परिसरातील गावे डव्वा येथील विज उपकेंद्राला जोडली असल्यामुळे डव्वा उपकेंद्रावर विजपुरवठ्याचा खूप जास्त अधिभार येत असतो.यामुळे घरगुती व कृषी विज ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे डव्वा व खोडशिवनी परिसरात विजेची समस्या सोडविण्याच्या हेतून राष्ट्रवादी काँगेसचे जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर यांनी या समस्येची दखल घेवून वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. तेव्हा खोडशिवनी येथे नवीन सब स्टेशन तयार केल्याशिवाय विजेच्या वेळोवेळी होणार्या त्रासापासून सुटका होणार नाही हे निदर्शनास खासदार प्रफुल्ल पटेल व आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या समोर आणून दिले.त्यावर खासदार पटेल यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना खोडशिवनी येथे सबस्टेशनचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देत सबंधित विभागाला पत्र दिले. नुकतेच जिल्ह्याचे पालकमंत्री प्राजक्त तनपुरे गोंदिया जिल्हय़ाचे दौरावर असताना हा सदर विषय गंगाधर परशुरामकर यांनी त्यांच्यासमोर मांडला.पालकमंत्री व ऊर्जाराज्यमंत्री तनपुरे यांनी लगेच प्रकरणात लक्ष घालत  खोडशिवनी येथे विज उपकेंद्रास समंती दिली.आणि त्यासंबधीचे आदेश 18 एप्रिल 2022 ला विद्युत विभागाने काढल्याने लवकरत या सबस्टेशनचे काम सुरु होणार असल्याने परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.परिसरातील डव्वा व खोडशिवणी येथील विजेचे प्रश्न यामुळे दूर होतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.खोडशिवणी व परिसरातील जनतेने खासदार प्रफुल पटेल,पालकमंत्री प्राजक्त तनपुरे, माजी आमदार राजेंद्र जैन,आमदार मनोहर चंद्रिकापुरे व गंगाधर परशुरामकर यांचे आभार मानले आहेत.