गोरेगाव तालुकास्तरीय भव्य महाआरोग्य मेळाव्यास नागरिकांची गर्दी

0
122

गोरेगांव,दि.22 :-आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार व राष्ट्रीय आरोग्य अभियान व सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (दि. २२) एप्रिलला गोरेगांव ग्रामीण रुग्णालयात तालुकास्तरीय भव्य मोफत आरोग्य मेळावा घेण्यात आला. या आरोग्य मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार विजयभाऊ राहांगडाले होते.
यावेळी जि.प.सदस्य पंकज राहांगडाले,जि.प सदस्य डॉ. लक्ष्मण भगत,जि.प.सदस्य शैलेश नंदेश्वर,को.ऑप.बॅंक डायरेक्टर रेखलाल टेंभरे सर्व पं.स.सदस्य,तहसिलदार सचिन गोसावी,गटविकास अधिकारी झेड.टी.टेंभरे,संजय बारेवार,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद चौव्हाण,वैद्यकिय अधिक्षक डॉ.स्वप्नील चिंधालोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या आरोग्य मेळाव्यामध्ये लाभार्थ्यांसाठी सर्व सुविधा मोफत देण्यात आल्या. सर्व रोग मोफत तपासणी विशेष तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत करण्यात आली. यात माता बालक सेवा,नवजात अभ्रक सेवा,किशोरवयीन आरोग्य सेवा,वयोवृद्ध उपचार, कुंटुंब नियोजन,सततच प्रतिबंधक,संसर्गजन्य आजार सेवा,असंसर्गजन्य आजार सेवा, नेत्ररोग, मोतीयाबिंदु, नाक, कान,घसा उपचार,कर्करोग,मधुमेह उपचार, क्षयरोग,सिकलसेल सेवा हृदय रोग, रक्तदाब, मेंदूचे आजार, फुफ्फुसाचे आजार, कॅन्सर, गरोदर माता व स्त्री तपासणी लहान मुलांचे आजार, किडनी आजार, त्वचा रोग, गुप्त रोग, अस्थिरोग, एचआयव्ही तपासणी, दंतरोग, कुष्ठरोग आदी आजाराची तपासणी करण्यात आली. तसेच मोफत रक्त, लघवी, एक्स रे व ई‌सीजी व गरजु रुग्णांना‌ आवश्यकतेनुसार उपचार व शस्त्रक्रिया महात्मा फुले योजने अंतर्गत करण्यात येणार आहे.
सदर मेळाव्यात आयुष्यमान भारत कार्ड तयार करण्यासाठी नोंदणी,आयुष्यमान भारत डिजीटल अभियान अंतर्गत हेल्थ आयडी नोंदणी, प्रधानमन्त्री जन आरोग्य योजना बाबद नोंदणी, महात्मा फुले जन आरोग्य बाबद् नोंदणी करण्यात आली.