कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना मिळाला 50000 सानुग्रह अनुदान

0
47

-युवा नेते रविकांत(गुड्डू) बोपचे यांच्या प्रयत्नांना यश..

तिरोडा- तालुक्यातील मौजा मुंडीकोटा, घोगरा, तिरोडा, चिखली, विहिरगाव, सोनेगाव या गावातील कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांनी सानुग्रह अनुदान मिळण्याकरिता ऑनलाइन दावे अर्ज सादर केले होते. मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणा मुळे त्यांना सानुग्रह राशी मिळण्यात विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागले. याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस चे युवा नेते रविकांत बोपचे यांनी सदर प्रकरणात पाठपुरावा केला व नातेवाईकांना 50 हजार सानुग्रह राशीचा लाभ मिळवून दिले.
ज्याअर्थी राज्याच्या महाविकास आघाडी सरकारने कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना 50 हजार रुपये सानुग्रह राशी देण्याची घोषणा केलेली होती त्या अंतर्गत मौजा मुंडीकोटा, घोगरा, तिरोडा, चिखली, विहिरगाव, सोनेगाव या गावातील कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांनी सानुग्रह अनुदान मिळण्याकरिता ऑनलाइन दावे सादर केले होते. मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे व काही नागरिकांना ऑनलाईन प्रणालीचा अभ्यास नसल्याने विविध अडचणींना सामोरे जावे लागले. यामुळे त्यांना सानुग्रह राशी मिळण्यात अडथडे निर्माण होत असल्याने सानुग्रह राशीकरिता पात्र लाभार्थ्यांनी ही माहिती राष्ट्रवादी काँग्रेस चे युवा नेते रविकांत बोपचे यांना दिली. दरम्यान रविकांत बोपचे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी या संदर्भात पाठपुरावा करून केले. सानुग्रह राशीकरिता पात्र नातेवाईकांना लाभ का दिला जात नाही, असा सवाल उपस्थित केला. दरम्यान त्यांच्या पाठपुराव्याची दखल घेत मौजा मुंडीकोटा येथील श्रीमती मनीषा रमेश गाढवे , मौजा घोगरा येथील श्री रामभाऊ बुधा भांडारकर, तिरोडा येथिल श्रीमती कामिनी लक्ष्मीकांत दुबे, सिमा सुहास कोटांगले, आशा रमेश कापसे, चिखली येथील ममता नैपाल मेश्राम, विहिरगाव येथिल श्रीमती सरिता भोजराज काळसरपे या लाभार्थ्यांना सानुग्रह राशी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. अखेर या लाभार्त्यांच्या बँक खात्यात सानुग्रह अनुदान जमा करण्यात आले. यामुळे लाभार्थ्यांनी रविकांत बोपचे यांचे आभार व्यक्त केले आहे.