विविध मागण्यासाठी न.प. कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन

0
31

आमगाव- विविध मागण्यांना घेवून नगर परिषद कर्मचार्‍यांचे राज्यभरात आंदोलन सुरू आहे. आमगाव येथेही समस्यांना घेऊन न. प. कर्मचार्‍यांनी आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, जोपर्यंत मागण्यांची पुर्तता होत नाही, तोपयर्ंत कामबंद आंदोलन सुरू राहणार, अशी माहिती न.प. कर्मचारी संघटनेचे तालुका अध्यक्ष श्रीकिशन उके यांनी दिली आहे.
नगरपरिषद नगरपंचायत कर्मचार्‍यांनी प्रलंबित मागण्यांसाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. पण, त्यांची दखल घेण्यात आली नाही. शासन या कर्मचार्‍यांच्या मागण्यांना घेऊन गंभीर नसल्याचे दिसून आल्याने महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग कर्मचारी संघटनेने १ मेपासून बेमुदत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपयर्ंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा संघटनेने घेतला असून याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी नगरपरिषद प्रशासन यांना देण्यात आला आहे. या आंदोलनात आमगाव नगर परिषद कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष श्रीकिसन उके, उपाध्यक्ष राजेश पांडे, सचिव शैलेश डोंगरे, सहसचिव सुरेंद्र बोहरे, निलेंद्र कपूर, संदीप बावनथडे, कुलदीप पशिने, रमेश वैकुंठी, ओमप्रकाश काटेखाये, हिरालाल उईके, ओमप्रकाश रहांगडाले, अकलेश राऊत, माधवराव मुनेश्‍वर, दिलीप फुंडे, रतिराम डेकाटे, राजेश डोंगरे, मुकेश वाकले हंसकला गायधने सारिका भारती तसेच नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.