गांधी सागर उद्यान व तलावाचे सौंदर्यीकरण झाल्याशिवाय शांत बसणार नाही:- इंजि. सागर गभने

0
30
तुमसर : शहरातली गांधी नगर मध्ये असलेल्या  गांधी सागर उद्यान व परिसर शेवटच्या घटका मोजत आहे. गेले कित्येक वर्षापासून उद्यान बंद आहे व शहरात त्या व्यतिरिक्त एकही असे स्थान नाही जिथे लोक फिरण्याकरिता जाऊ शकतात व मुले खेळू शकतात व जेष्ठ नागरिक बसु शकतात, वारंवार तक्रार करूनही नगरपालिका याकडे दुर्लक्ष करीत होते, एकूणच नगरपालिकेच्या दुर्लक्षितपणाने गांधी सागर उद्यानाचे अस्तित्व धोक्यात आले असून याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन सफाई करून उद्यान परत सुरु करण्याकरिता नागरिकांकडून मागणी केली जात असल्यामुळे राजमुद्रा ग्रुप संस्थापक- अध्यक्ष इंजि.सागर गभने यांनी पुढाकार घेत आमदार राजूभाऊ कारेमोरे व नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम नगरपरिषद तुमसर यांना बोलावून उद्यानाची पाहणी केली व गांधी सागर तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी उपायोजना करण्याबाबत सुचवले.
               यावेळी आमदार राजूभाऊ कारेमोर यांनी लवकरात लवकर सौंदर्यीकरण करुन मुलांसाठी नविन खेळणे व ज्येष्ठ नागरिकांसाठी व्यायामाची व्यवस्था करू अशी ग्वाही दिली.
                लगत असलेला गांधी सागर तलाव परिसरात खाज पसरवणारी वनस्पतीची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे व इतर कारणाने त्याचा प्रसार होत आहे व त्या मुळे नागरिकांना त्रास सहन करावं लागत आहे व गंभीर रोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे त्यामुळे लवकरात लवकर नगर परिषदेमार्फत तलावाची सफाई करण्यात यावी अशी मागणी केली. सोबतच बुद्ध विहार ते लांजेवार आटा चक्की परिसरातील स्ट्रीट लाईट सुरू करण्याची मागणी इंजि. सागर गभने यांनी केली.