लोधीटोला व गौतमनगर नाल्यात चौघे वाहून गेले

0
112

गोंदिया,दि.13ः– तालुक्यातील तुमखेडा खुर्द (लोधीटोला)  येथे शेताच्या कामाकरीता जात असताना दोघांचा नाल्यात वाहून गेल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली.वाहून गेलेल्या शेतमजुराचां शोध आपत्ती निवारण विभागाचे शोधपथक घेत आहे.वाहून गेलेल्यामध्ये आशिष धर्मराज बागडे(वय 23) व संजू प्रमोद बागडे (वय 25) रा. पूजारीटोला – लोधीटोला (तुमखेडा खुर्द) यांचा समावेश आहे.हे दोघेही शेताच्या कामाकरीता जात असताना नाल्यात अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने वाहून गेले.घटनेची माहिती होताच आपत्ती निवारण विभागाचे चमू घटनास्थळी दाखल होत शोधमोहीम सुरु केली आहे.त्याचप्रमाणे गोंदिया शहर पोलीस स्टेशन अंतर्गत, गौतम नगर येथील चौथा नाला या ठिकाणी आंघोळीला गेलेला जावेद अली हजरत अली सय्यद, वय 24,व बाबा उर्फ रेहान कलीम शेख, वय 15 दोघेही राहणार गौतमनगर पुराच्या पाण्यात सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान वाहून गेल्याची माहिती प्राप्त झाली आहे.