प्राथमिक शिक्षकांचे जि. प. समोर धरणे

0
24
वाढदिवसाच्या शुभेच्छा

नक्षलभत्ता व अतिरिक्त घरभाडे भत्त्यासह अन्य मागण्यांचा समावेश; एक हजारावर शिक्षक सहभागी
गोंदिया, ता. २५ ः न्यायालयाच्या आदेशानुसार तसेच शासन निर्णयनानुसार जिल्ह्यातील शिक्षकांना नक्षलभत्ता व अतिरिक्त घरभाडे भत्ता देण्यात यावा, या प्रमुख मागणीसह अन्य
मागण्यांसाठी प्राथमिक शिक्षकांनी सोमवारी (ता. २५) जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या बॅनरखाली झालेल्या या आंदोलनात जिल्ह्यातील एक हजारावर शिक्षक सहभागी झाले होते.
न्यायालयाच्या आदेशानुसार तसेच शासन निर्णयनानुसार जिल्ह्यातील शिक्षकांना नक्षलभत्ता कमाल मर्यादेत १५०० रुपये व अतिरिक्त घरभाडे भत्ता लागू करण्यात यावा, उच्चश्रेणी मुख्याध्यापक, पदवीधर विषयशिक्षक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी व हायस्कूल शिक्षकांची रिक्त पदे पदोन्नतीने सहाय्यक शिक्षकांमधून तातडीने भरण्यात यावी, ६, ७ व ८ आॅगस्ट २०१८ या कालावधीतील तीन दिवसीय संपकालीन वेतन देण्यात यावे, सडक अर्जुनी पंचायत समितीअंतर्गत अपहार प्रकरणातील उर्वरित प्राथमिक शिक्षकांचे सातव्या वेतन आयोगाचे थकबाकीचे हप्ते शिक्षकांच्या खात्यात जमा करण्यात यावे, पदवीधर विषय शिक्षकांना वेतन श्रेणी लागू करण्यात यावी, प्रलंबित चटोपाध्याय व निवडश्रेणी प्रकरणे निकाली काढण्यात यावी, एकस्तर क्षेत्रातील आंतरजिल्हा बदलीने गोंदिया जिल्ह्यात आलेल्या शिक्षकांना अखंडित एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ देण्यात यावा, हिंदी, मराठी सूट, उच्च परीक्षा परवानगी प्रकरणे, स्थायीची प्रकरणे, वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके निकाली काढण्यात यावी,जिल्हा परिषद शाळांमध्ये रिक्त असलेली शिक्षकांची पदे भरण्यात यावी,
कार्यरत असेपर्यंत सरसकट सर्वांनाच एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ देण्यात यावा, पदवीधर व उच्चश्रेणी मुख्याध्यापकांच्या वेतनातील तफावत दूर करण्यात यावी,सरसकट सर्वच विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात यावे,यासह अन्य मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात मनोज दिक्षीत, जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरवार, एल. यू. खोब्रागडे, संदीप मेश्राम, संदीप तिडके, विनोद बडोले, एन. बी. बिसेन, प्रदीप रंगारी, पी. आर. पारधी, एस. डी.नागपुरे, किरण बिसेन, प्रदीप बडोले, महेश कवरे, गजानन पाटणकर, विनोद बहेकार, दिनेश उके, सेवक रहांगडाले, शोभेलाल ठाकूर, क्रिश कहालकर, रमेश गहाणे, संजू बोपचे, विलासडोंगरे, दिनेश बिसेन, नरेंद्र सूरजजोशी, उमेश रहांगडाले, सतीश दमाहे, दिलीप लोधी, अशोक बिसेन, गौतम बांते, वाय. पी. लांजेवार, राजू बोपचे, आर. सी. मंडेले, लोकनाथ तितराम,रजनी मेश्राम, दीक्षा फुलझेले यांच्यासह समितीचे अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.